Advertisement

टेकाडी शाळेत जीवन मुंगले मित्र परिवार सेवा प्रतिष्ठाण द्वारे शैक्षणिक साहित्य वाटप

टेकाडी शाळेत जीवन मुंगले मित्र परिवार सेवा प्रतिष्ठाण द्वारे शैक्षणिक साहित्य वाटप

कन्हान : - टेकाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जीवन मुंगले मित्र परिवार सेवा प्रतिष्ठान द्वारे विद्यार्थ्यांना शुक्रवार (दि.८) रोजी रक्षाबंधन या पवित्र पर्वाच्या शुभ मुहूर्तावर शालेय साहित्याचे वितरण प्रतिष्ठानचे प्रवर्तक मा. जीवन मुंगले यांचे शुभहस्ते करण्यात आले .

शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप नेते, रामटेक जिल्हा उपाध्यक्ष मा.संजय मुलमुले , प्रमुख अतिथी प्रतिष्ठाणचे संस्थापक मा.जीवन मुंगले , पत्रकार किशोर वासाडे , शाळेच्या शिक्षिका जयश्री चवरे , कन्हान मंडल भाजप अध्यक्ष बिरेंद सिंग , टेकाडी ग्रामपंचायत (को.ख.) सरपंच विनोद इनवाते , उपसरपंच जितेंद्र चव्हाण प्रामुख्याने उपस्थित होते .
या प्रसंगी पंचायत समिती सदस्य नरेश मेश्राम , अविनाश कांबळे , सुरेंद्र बुधे , लाखेश्वर वासाडे , विलास हूड , कुणाल वासाडे , कन्हान नगरपरिषद माजी नगरसेवक राजेंद्र शेंद्रे , मनोज कुरडकर , नगरसेविका सुषमा चोपकर , अनिता पाटील , संगिता खोब्रागडे , शैलेश शेळके आणि सेवा प्रतिष्ठाण चे पदाधिकारी उपस्थित होते .

माणुस ज्या समाजात जन्माला येतो त्या समाजा प्रति त्यांचे कर्तव्य , एक सामाजिक बांधिलकी , जबाबदारीने सामाजिक ऋण फेडण्याच्या सार्थ उद्देशाने प्रेरित होऊन गरीब व गरजवंत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी व निरंतर शिक्षणाचा प्रवास सुरू राहण्याकरिता सेवा प्रतिष्ठान द्वारे शैक्षणिक साहित्याची मदत करण्यात येत असल्याचे सेवा प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष व भाजप लोकसभा विस्तारक मा. जीवन मुंगले यांनी प्रास्ताविकातुन मनोगत व्यक्त करतांना संबोधित केले . 

प्राथमिक विभागाच्या गरजु व गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्या अंतर्गत कंपास स्कुल बॅग , बूट वाटप करण्यात आले . यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा हात पुढे केल्याबद्दल किशोर वासाडे यांनी प्रतिष्ठानचे धन्यवाद व्यक्त केले .

कार्यक्रमाचे सुत्र संचालन नीलकंठ मस्के यांनी तर उपस्थितांचे आभार शिक्षिका जयश्री चवरे यांनी मानले . कार्यक्रमाच्या आयोजनासाठी विलास हुड , मंगेश काठोके , विशाल सातपैसे , विलास सावरकर आदींनी सहकार्य केले .

कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या