दोनशे एकरातील धान पीक जळाले , नुकसान भरपाई तात्काळ देण्याची मागणी
कन्हान : - पारशिवनी तालुक्यातील नांदगांव , वाघोली , वराडा येथील शेतकऱ्यांवर संकटाचे वादळ निर्माण झाले आहे . राष्ट्रीय महामार्गा क्रमांक ४४ वरील शिवधुऱ्या जवळील पेंच पाटबंधारेच्या कालव्यात अज्ञात टॅंकर चालकाने मंगळवार (दि.५) आॅगस्ट रोजी पहाटे ३ ते ४ वाजता च्या दरम्यान अॅसिडयुक्त केमिकल टाकल्याने कालव्याचे पाणी दुषित झाले . हे पाणी कालव्याचा प्रवाहा सोबत शेतात गेल्याने शेतकऱ्यांचे दोनशे एकरातील धान पिक जळुन खाक झाली आहेत .
घटनेमुळे वाघालो , नांदगांव , वराडा येथील शेतकऱ्यांचे धान पिक आणि शेत जमीन पुर्णपणे नष्ट झाली . काही शेतकऱ्यांनी लावणी केली होती , तर काही लावण्याचा तयारीत होते . अॅसिडयुक्त पाण्यामुळे धानाचे रोप करपले आहे . जमिनी सुद्धा लालसर होऊन नापिक झाली आहे . कलव्याचे बाजुचे गवतही जळुन गेले आहे . मागील वर्षी सुद्धा हा प्रकार डुमरी येथील पवन टिकम यांचा शेतात घडल्याचे सांगण्यात येत आहे . या केमिकलमुळे त्यांची शेती नापिक झाली आहे .
घटनेमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी अज्ञात केमिकल टँकर वाहन चालक आणि केमिकल मालकास पकडुन कठोर कारवाई करून शेतकऱ्यांची नुकसान भरपाई त्याचे जवळुन शासनाने वसुल करून शेतकऱ्यांच्या शेतपिकाची आणि शेत जमिनीची नुकसान भरपाई तात्काळ देण्याची मागणी शेतकरी गट ग्राम पंचायत वराडा सरपंच सुनिल जामदार , उपसरपंच भोजराज काकडे , ओमप्रकाश काकडे , सिताराम भारद्वाज , देवाजी भोयर , देवीदास जामदार , देवाजी ठाकरे , लक्ष्मीकांत काकडे , हरिसिंग यादव , सफिक कुरेशी , रविंद काकडे , गजानन काकडे , संतोष ठाकरे , रौनक काकडे , आशु काकडे , अनिकेत खेरगडे , गौरव भोयर , गोलु यादव , करण काकडे , तुषार ठाकरे , पौनिकर, जर्नाधन मल्लीपरी , रघुनाथ काकडे , बळीराम काकडे , मुरलीधर काकडे , पवन टिकम , राजेंद्र काकडे , सनोज काकडे , रामदास काकडे, पवन मिसार , नरेश बाटबरई , शफिक कुरेशी , दिंगाबंर खेरगडे , देवराव माहुरे , देवा कनोजिया , यादोवराव काकडे , चक्रधर ठाकरे , अतुल काकडे , अक्षय काकडे , भुजंग शहाणे , धर्मा काकडे सह परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे .
कृषि अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहचुन पंचनामा केला
घटनेची माहिती मिळताच कन्हान पोलीस , तलाठी , कृषी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहचुन पंचनामा केला . तसेच प्रकरण उपविभागिय अधिकारी रामटेक , तहसिलदार पारशिवनी यांचा कडे पाठविणार आहे .
ओमप्रकाश (महेश) काकडे व शेतकरी मित्र परिवार व्दारे शेतकऱ्यांना पाणी जनावरांना पाजु नये , अशी सुचना देत सर्तक राहण्याचे आव्हाहन केले आहे .
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर
0 टिप्पण्या