पैश्याचा वादातुन युवकावर चाकुने हल्ला , आरोपी अटक
कन्हान : - कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत नुकताच येसंबा गावात उधारीचा पैशाचा वादातून तरुणावर चाकु हल्ला झाला. हे वातावरण गरम असतानाच कन्हान शहरातील वाघधरे वाडी परिसरात उधारी पैशाचा वादातून भररस्त्यात गाठून तरुणांवर चाकु हल्ला करण्यात आला . आरोपींना पोलिसांचा धाक संपला की काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
प्रमोद प्रकाश कांबळे (२३) यांने आरोपी कोहीनुर भोला इंचुलकर (१९) दोघेही रा.वाघधरे वाडी यांचा कडे काही दिवसा पुर्वी मोबाईल ठेऊन २५०० रुपये उधार पैसे घेतले होते . रविवार (दि.१७) आॅगस्ट रोजी कोहीनुर ला ते पैसे परत करुन मोबाईल घेण्यासाठी प्रमोद ने फोन केला. २५०० रुपये उधार असलेले कपात करुन मोबाईल परत दे असे म्हटले असता रोडवर बोलाविले परंतु मोबाइल दिला नाही . प्रमोद घरी गेल्यावर कोहीनूर ने फोन केला , फोन वडिलांनी उचलल्याने त्यांना आरोपी ने शिवीगाळ करुन धमकी दिली .
प्रमोद कोहीनूर ला भेटण्यासाठी घरासमोरील रोडवर गेला व त्याला कशाला धमकी देतो असे म्हटले असता कोहीनुर ने प्रमोद सोबत उधारीच्या पैशाचे कारणा वरुन झगडा भांडण केले . कोहीनूरने जवळच्या चाकुने प्रमोदच्या गळ्यावर जीवे मारण्याचा उद्देशाने वार करुन जख्मी केले . या प्रकरणी कन्हान पोलीसांनी प्रमोद कांबळे यांचा तक्रारी वरून आरोपी कोहीनूर इंचुलकर विरुद्ध गुन्हा दाखल करून अकट केली आहे . घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांचा मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक प्रवीण हारगुडे, सम्राट वनप्रती करीत आहे .
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर
0 टिप्पण्या