माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी आणि नेताजी सुभाष चंद्र बोस यांना अभिवादन
कन्हान : - टेकाडी परिसरातील केडीके कॉन्व्हेंट शाळेत देशाचे माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी आणि नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या संयुक्त पुण्यतिथि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित शाळेचे संचालक अविनाश कांबळे यांच्या हस्ते अटल बिहारी वाजपेयी आणि नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली .
यावेळी बिरेंद्र सिंग यांनी अटल बिहारी वाजपेयी आणि सुरेंद्र बुधे यांनी नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा जीवन चरित्र्यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले . उपस्थीतांनी अटल बिहारी वाजपेयी आणि नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन केले . या प्रसंगी किशोर वासाडे , भगवानदास यादव , विलास हुड , लाकेश्र्वर वासाडे , बबनराव कांबळे , चक्रधर आखरे , भाऊराव लेकुरवारे ,
मनिषा कांबळे , सुरेखा कांबळे , अर्पणा गजभिए , अर्चना कारेमोरे , निशा कांबळे सह शाळेचे विद्यार्थी , शिक्षक , कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते .
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर
0 टिप्पण्या