कन्हान मध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी विविध कार्यक्रमाने उत्साहाने साजरी
कन्हान : - कन्हान शहरातील हनुमान मंदिर गांधी चौक येथे शिव पंचायत हनुमान मंदिर कमेटी आणि सकल हिंदु समाज कन्हान यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव विविध कार्यक्रमाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .
शुक्रवार (दि.१५) ला सायंकाळी शिव पंचायत हनुमान मंदिर कमेटी आणि सकल हिंदु समाज कन्हान यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाची सुरूवात करून रात्री १२ वाजता विनोद यादव यांचा हस्ते भगवान श्रीकृष्ण मुर्तीची दही , दुधाने जलाभिषेक करुन विधिवत पूजा अर्चना करण्यात आली . आरती करुन श्रीकृष्णचा पाळणा हलवुन ढोल ताशाच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करुन आनंदोत्सव साजरा करण्यात आला . "हाथी घोडा पालकी जय कन्हैया लाला की, श्री कृष्ण भगवान की जय " चा जयघोष करण्यात आला . केक कापुन प्रसाद वितरण करण्यात आले. शनिवार (दि.१६) ऑगस्ट रोजी सायंकाळी हनुमान मंदिर समोर बुंदी वितरण करुन श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .
या प्रसंगी शिव पंचायत हनुमान मंदिर कमेटी अध्यक्ष मोहनसिंग यादव , लहु तिवारी , नंदलाल यादव , सकल हिंदु समाज कन्हान क्षेत्र अध्यक्ष शुभम बावनकर , ज्ञानेश्वर दारोडे , कँप्टन सतिश बेलसरे , अजय पाली , नारायण गजभिये , निलेश यादव , सुजल यादव , विनोद यादव , निलेश यादव , ओम यादव , शिव यादव , ऋषभ बावनकर , अमन यादव , शुभम यादव , किशोर यादव , आनंद शर्मा , पुर्वेश नाईक , हिमांशु कोसरे , सार्थक खंगारे सह भाविक भक्त मोठ्या संख्येत उपस्थित होते .
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर
0 टिप्पण्या