कन्हान : - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कन्हान - कांद्री शहर च्या वतीने आंबेडकर चौक येथे ७९ वा स्वातंत्र्य दिवस निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. रणविरजी वर्मा , प्रमुख पाहुणे किशोर बेलसरे कार्याध्यक्ष नागपूर जिल्हा (ग्रामीण) , मायाताई भोयर महिला संघटिका यांच्या हस्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेला पुष्प हार मालार्पण करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली . माजी सरपंच भगवान नितनवरे यांचा हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .
कार्यक्रमाचे सुत्र संचालन शफीक शेख यांनी केले व आभार प्रदर्शन शहर अध्यक्ष कॅप्टन सतीश बेलसरे यांनी केले . या प्रसंगी अकरम कुरेशी , तालुका अध्यक्ष पुरणदास तांडेकर , नरेन्द्र वाघमारे कमलेशजी शर्मा , रॉबीन निकोसे , महिला कन्हान शहर अध्यक्ष सुवर्णा रामापुरे , कांद्री शहर महिला अध्यक्ष सौ. निशाताई ठाकरे , भगवान सरोदे , ज्ञानेश्वर विघे , विष्णू बेहरा , श्याम पीपलवा , लहुजी तिवारी , गणेश पानतावणे , रतीराम सहारे , शैलेश झेंडे , नितीन मेश्राम , केतन भिवगडे ,राजेश राठी , दिलीपजी जैस्वाल , प्रकाश तिमांडे होते .
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर
0 टिप्पण्या