Advertisement

भव्य रक्तदान आणि नेत्र तपासणी शिबीराने स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा |


भव्य रक्तदान आणि नेत्र तपासणी शिबीराने स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा 

कन्हान : - भुमिपुत्र बहुउद्देशीय संस्था द्वारे ७९ व्या स्वातंत्र्य दिवसाचे औचित्य साधुन भव्य रक्तदान आणि नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन महाकाली काॅम्पलेक्स तारसा चौक कन्हान येथे करण्यात आले . रक्तदान शिबीरात इंदिरा गांधी शासकीय रक्तपेटी यांचा चमुंच्या सहकार्याने एकुण ७० रक्तदात्यांनी रक्तदान केले .  नेत्र तपासणी शिबीरात जगनाथ नेत्रालय सुपर स्पेशालीटी नागपुर यांच्या चमुंच्या सहकार्याने एकुण ९५ नागरिकांच्या डोळ्यांची तपासणी करुन चश्मे वितरित करण्यात आले . कार्यक्रमात सामाजिक व राजकीय आणि विविध क्षेत्रातील लोकांनी भेट देऊन उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या . 

संस्थेचे अध्यक्ष शिवशंकर (चिंटु) वाकुडकर यांनी सर्वांचे आभार मानले . कार्यक्रमाच्या  यशस्वीतेकरिता भुमिपत्र बहुउद्देशीय संस्था कन्हान अध्यक्ष शिवशंकर (चिंटू) वाकुड़कर , शमशेर पुरवले, रजनीश मेश्राम , सुनील लक्षने , आशीष वानखेड़े , अशोक नारनवरे , हरिष तिडके , भरत चकोले , पवन नानोटे , सुमेध नितनवरे , मंगेश धोटे , दीपक कुंभलकर , सचिन कटरे , केशल पवार , गणेश चौबीतकर , भरत फरकाडे , करण पाली , राम थदानि , कार्तिक पिल्ले , गुड्डा सूर्यवंशी , राजू चोपकर , जगन कारेमोरे , राधेश्याम राउत , शशिकांत दारोंडे , समीर गायकवाड़ , सोमलाल पात्रे , आविश पुरवले , रितिक पात्रे सह आदि नागरिकांनी सहकार्य केले .


कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या