Advertisement

यशवंत विद्यालय वराडा येथे स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा


यशवंत विद्यालय वराडा येथे स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा

कन्हान : - यशवंत विद्यालय वराडा येथे शाळेच्या मुख्याध्यापिका के.बी.निंबाळकर यांचे अध्यक्षेत ग्रामपंचायत वराडा चे सरपंच मा.सुनिल जामदार यांचे हस्ते ध्वजारोहन करण्यात आले . विद्यार्थ्यांनी संगितावर कवायत , डमलेश कवायत शिस्तित सादर केली . 

या प्रसंगी पोलीस पाटील संजय नेवारे , मारोती नागमोते , सुभाष देऊळकर , विपला फॉऊडेशनचे निखिल किनेकर , सुरज थुल आदी प्रामुख्याने उपस्थित होते . स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत (दि.१३)ऑगस्ट पासुन रोज सकाळी शाळेत झेंडावंदनाचा कार्यक्रम घेण्यात आला . विद्यार्थ्यांची निबंध स्पर्धा , रांगोळी स्पर्धा , वादविवाद स्पर्धा , तिरंगा रॅली इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले . 

तीन दिवस विविध कार्यक्रमाने स्वातंत्र दिन उत्साहने साजरा करण्यात आला . सुत्रसंचालन राकेश गणविर सर यानी तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतिश कुथे सर यांनी केले . कार्यक्रमाच्या यशस्विते करिता राजेंद्र गभणे सर , अर्चना शिंगणे मँडम , कु.पायल कोटरूंघे मँडम , मोतीराम रहाटे , दिपक पांडे सह विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले . 


कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या