श्रीमती हिराबाई उच्च प्राथमिक शाळा कन्हान येथे स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा
कन्हान : - श्रीमती हिराबाई उच्च प्राथमिक शाळा कन्हान येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. या प्रसंगी बुधवार (दि.१३) ऑगस्ट पासुन रोज सकाळी शाळेत झेंडावंदनाचा कार्यक्रम घेण्यात आला . स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत विद्यार्थ्यांची निबंध स्पर्धा , रांगोळी स्पर्धा , चित्रकला स्पर्धा , वादविवाद स्पर्धा , तिरंगा रॅली इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले . शुक्रवार (दि.१५) ऑगस्ट ला प्रमुख पाहुणे शाळेचे संस्थाचालक नरेंद्र वाघमारे साहेब यांचे शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
प्रमुख उपस्थिती म्हणुन माजी मु.अ आयशा अन्सारी मॅडम , माजी स.शिक्षिका मंदाकिनी रंगारी मॅडम यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवली . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नेहा गायधने मॅडम तसेच प्रस्ताविका शाळेचे मुख्याध्यापक हेमंत वंजारी सर यांनी केले . तर आभार प्रदर्शन पवन ठमके सर यांनी केले . कार्यक्रमास गीता वंजारी मॅडम , भास्कर सातपुते सर , अभिषेक मोहनकर सर , कीर्ती वैरागडे मॅडम , जयश्री पवार मॅडम योगिता चांदेवार मॅडम आणि वस्तीगृहाचे अधिक्षक गणेश रामापुरे सर आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर
0 टिप्पण्या