पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाला गणेशभक्तांचा चांगला प्रतिसाद
शहरात विविध ठिकाणी मनपाचे उभारले पर्यावरणपूरक विसर्जन कुंड
नागपूर, ता. २८: पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करताना श्री गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरातील विविध भागात कृत्रिम विसर्जन कुंडांची व्यवस्था करण्यात आली आहे. नागपूर महानगरपालिकेने घेतलेल्या या पर्यावरणपूरक पुढाकाराला गणेशभक्त देखील चांगला प्रतिसाद देत आहेत. शहरात ठिकठिकाणी असलेल्या कृत्रिम तलावांमध्ये पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात गणेश मूर्तींचे विसर्जन करीत गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत, श्रीमती वैष्णवी बी. आणि अतिरिक्त आयुक्त श्री. अजय चारठाणकर यांच्या मार्गदर्शनात घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत श्रीगणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी शहरातील २१६ ठिकाणी ४१९ कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे.
एक दिवसीय व दीड दिवसीय गणेश विसर्जनासाठी शहर
Good response from Ganesh devotees to eco-friendly Ganesh immersion
jayant dongre-Kamptee Nagpur
0 टिप्पण्या