अज्ञात वाहनाच्या धडकेत वासरू आणि बछडयाचा मृत्यु , २ गाय जख्मी
दोन गाई गंभीर जख्मी, तरुणांच्या प्रयत्नाने गाईला जीवनदान.
सकल हिंदू समाज कन्हान आणि गौसेवा समिती विदर्भ प्रांत यांची कामगिरी.
कन्हान : - कांद्री आणि कोळसा खदान परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी अज्ञात वाहनाच्या धडकेत एक वासरु आणि बछड्याचा मृत्यु झाला . तर दोन गाई गंभीर जख्मी झाल्याने सकल हिंदु समाज कन्हान आणि गौसेवा समिती विदर्भ प्रांतच्या तरुणांनी पुढाकार घेऊन गाई ला जीवनदान देऊन प्राणी रूग्णवाहिकेच्या मदतीने उपचारा कामी जैन गौशाला काटोल रोड नागपुर येथे पाठविण्यात आले .
शनिवार (दि.१६) ऑगस्ट रोजी सायंकाळी पहिली घटना कांद्री परिसरात लावारिस गाईला अज्ञात वाहनाने धडक मारली. धडकेत गाईला अंदरुनी गंभीर दुखापत झाली . निखिल गुप्ता यांचा घराजवळ गाईने वासराला जन्म दिला. गाईला अंदरुनी दुखापत झाल्याने वासराचा मृत्यु झाला . रविवार (दि.१७) ऑगस्ट रोजी सकल हिंदु समाज कन्हान क्षेत्राचे अध्यक्ष शुभम बावनकर यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी पोहचुन पाहणी केली असता वासरु मृत अवस्थेत प्रेत मिळुन आले . शुभम बावनकर यांनी गौसेवा समिती विदर्भ प्रांत चे संस्थापक अध्यक्ष साई कनोजिया यांना घटनेची माहिती दिली असता घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील नागरिकांना विचारपुस केली असता गाई सुखनंदन पंडित यांची असल्याची माहिती मिळाली . परंतु पोलीस हवालदार यशवंत चारदेवे, महेश बिसेन यांचा समक्ष सुखनंदन पंडित यांना विचारपुस केली तर त्यांनी नकार दिला . तरुणांनी सुरक्षित ठिकाणी हलवुन वासराला मातीत दफन केले. कन्हान पोलीसांना सुचना देऊन जख्मी गाईला प्राणी रूग्णवाहिकेच्या मदतीने जैन गौशाला काटोल रोड नागपुर येथे उपचारा कामी पाठविण्यात आले .
सोमवार (दि.१८) ऑगस्ट रोजी दुसरी घटना वेकोलि कामठी खुली कोळसा खदान नंबर ३ परिसरात घडली . अज्ञात वाहन चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणाने चालवुन बछड्याला आणि गाईला जोरदार धडक मारली . या धडकेत बछड्याचा जागीच मृत्यु झाला आणि गाय गंभीर जख्मी झाली . घटनेची माहिती सकल हिंदु समा ज कन्हान क्षेत्राचे अध्यक्ष शुभम बावनकर यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी पोहचुन पाहिले असता बछडा मृत आणि गाय गंभीर जख्मी अवस्थेत दिसुन आली .
शुभम बावनकर यांनी वेकोलि कामठी खुली कोळसा खदान प्रभारी सुरक्षा अधिकारी संतोष यादव यांना माहिती दिली असता त्यांनी सुरक्षा रक्षकांना घटनास्थळी पाठविले . गाय मालक छेदीलाल चव्हाण यांनी मदतीची हाक दिल्याने शुभम बावनकर यांनी घटनेची माहिती गोसेवा समितीचे संस्थापक प्रमुख अध्यक्ष साई कनोजिया यांना दिली . त्यांनी घटनास्थळी पोहचुन जैन गौशाला येथुन प्राणी रूग्णवाहिकेची व्यवस्था करून जख्मी गाईला जैन गौशाला काटोल रोड नागपुर येथे पाठविण्यात आले . मृत्यु झालेल्या बछड्याला जेसीबीच्या साहाय्याने गड्डा करून माती देण्यात आली .
यावेळी गौ सेवा समितीचे संस्थापक प्रमुख अध्यक्ष साई कनोजिया , सकल हिंदु समाज कन्हान क्षेत्राचे अध्यक्ष शुभम बावनकर , आयुष संतापे , लोकेश दमाहे , ऋषभ बावनकर , हिमांशु सावरकर , कार्तिक सिंग , करण सिंग , निखिल , योगेश श्रीवास्तव , लक्ष चोपडा , स्वराज भिंगेवार , नागेश्वर बावनकुळे , प्रणय वाडीभस्मे सह नागरिकांनी उपस्थित राहुन सहकार्य केले .
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर
0 टिप्पण्या