Advertisement

कन्हान स्मशान भूमीसाठी १ कोटी २० लाख रुपयांच्या निधीला मंजुरी |


कन्हान स्मशान भूमीसाठी १ कोटी २० लाख रुपयांच्या निधीला मंजुरी


खासदार श्यामकुमार बर्वे यांच्या प्रयत्नांमुळे जिल्हा नियोजन समितिच्या बैठकीत निर्णय

कन्हान - : रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार श्यामकुमार बर्वे यांच्या प्रयत्नांमुळे सोमवार (दि. १८) ऑगस्ट रोजी झालेल्या

जिल्हा नियोजन समितिच्या बैठकीत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कन्हान स्मशान भूमीसाठी १ कोटी २० लाख रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे .


शहातील स्मशानभूमीची समस्या मागील अनेक वर्षापासुन गंभीर होत चालली होती . सुसज्ज स्मशान घाटाकरिता भूमी नसल्यामुळे कामठी परिसरातील कन्हान नदीच्या काठावर मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावे लागत होते . उन्हाळयात , पावसाळ्यात देखिल मृतदेहांवर अंतिम संस्कार करतांना अनेक अडचणीचा नागरिकाना सामना करावा लागते .काही दिवसान पुर्वी नागरिकांनी खासदार श्यामकुमार बर्वे यांना निवेदन देऊन स्मशान भूमीची समस्या सोडविण्याची मागणी केली होती . 

जिल्हा नियोजन समितिच्या बैठकीत कन्हान शहरातील स्मशान भूमीचा प्रश्न तात्काळ मार्गी लावाला अशी मागणी श्यामकुमार बर्वे यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना केल्याने त्यांनी तात्काळ जमीन पाहुन त्वरीत अधिग्रहणाची कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विपिन डॉ.विपिन इटनकर यांना दिले आहे .


निवडणुकीत दिलेले आश्वासन खासदार श्यामकुमार बर्वे यांनी पुर्ण केले


लोकसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान खासदार श्यामकुमार बर्वे यांनी निवडुन आल्यास कोणत्याही किंमतीत कन्हान स्मशान भूमीचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते . निवडुन येताच त्यांनी नगर परिषदेत बैठक घेऊन स्मशान भूमीसाठी नवीन प्रस्ताव पाठवुन तो लवकरच मंजुर करण्याचे आश्वासन दिले होते . कन्हान - पिपरी नगर परिषदेत जमिन उपलब्ध ते बाबत एकमत नसल्याने आणि तांत्रिक कारणांमुळे प्रस्ताव पारित होत नव्हता . अश्यात सुसज्ज स्मशान भूमीसाठी जमीन हा सर्वात मोठा अडथळा होता .

खासदार श्यामकुमार बर्वे यांनी नगर परिषद मुख्याधिकारी यांना जमीन निश्चित करण्याचे आणि पुन्हा प्रस्ताव पाठवण्याचे आदेश दिले होते . कन्हान - पिपरी नगर परिषदेच्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या सर्व नगरसेवकांनी , नगराध्यक्षा व उपाध्यक्ष आणि नगरपरिषद प्रशासनाने एकमताने सत्रापुर कामगार छावणी जवळील घोष नावाच्या व्यक्तीच्या मालकी च्या ०.७६ हेक्टर जमिनीचा प्रस्ताव पाठवला होता . पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षेत झालेल्या बैठकीत खासदार श्यामकुमार बर्वे यांनी स्मशान भूमीसाठी भूसंपादनाकरिता निधीचा मुद्दा उपस्थित केला आणि निधीची मागणी केली . बैठकीत भूसंपादनाकरिता १ कोटी २० लाख रुपयांच्या निधी मंजुरी दिली आहे .


कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या