पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय व भारतरत्न इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय येथे ७९ वा स्वातंत्र्य दिवस सोहळा
कन्हान : - नगर सुधार समिती कन्हान द्वारा संचालित पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय व भारतरत्न इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय रेल्वे स्टेशन रोड कन्हान येथे ७९ वा स्वातंत्र्य दिवस सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला . कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ.छाया नाईक अध्यक्षा नगर सुधार समिती आणि पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयाची इयत्ता दहावीच्या परीक्षेत प्रथम आलेली विद्यार्थिनी कुमारी.त्रिशा वसंत पेंदाम यांच्या शुभहस्ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रपीता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन ध्वजारोहण करण्यात आले .
कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक आर.आर.लाखपाले, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य एस. आर बनकर आणि इतर मान्यवरांनी स्वातंत्र्य दिवसा वर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या . शाळेचे व कनिष्ट महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीत , भाषणे , नाटक व नृत्य सादर केली . स्व.श्री माणिकराव वाघधरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली .
गरजू विद्यार्थ्यांना प्रतिष्ठित मान्यवरां कडून गणवेश वितरित करून त्यांचे मनोबल वाढवुन स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.वंदना दिपक गजभे यांनी केले आणि आभार प्रदर्शन सौ.रंजना माहूरकर यांनी केले .
यावेळी नगर सुधार समितीचे पदाधिकारी दिनकरराव मस्के , वासुदेवराव चिकटे , प्रकाश नाईक , मिलिंदराव वाघदरे , सौ.अलकाताई कोल्हे , सौ.प्रियंका वाघधरे , पुरुषोत्तम कुंभलकर , कैलास भिवगडे , रमेश चित्रीव , वसंतराव इंगोले , अंबादासजी चकोले , बिरेंद्र सिंह , रिंकेश चवरे , आशिष दिवटे , मायाताई कांबळे , सौ. सुनीता येरपुडे , सौ.मुन्नी चव्हाण , राजेंद्र शेंदरे , सौ.प्रतीक्षा चवरे , सौ.सुनंदा दिवटे , यांचा सह विद्यालयाचे मुख्याध्यापक , प्राचार्य , शिक्षकवृंद , शिक्षकेतर , कर्मचारी आणि विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते .
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर
0 टिप्पण्या