देशभक्तीवर गीतांच्या गायनातून ७९ वा स्वातंत्र्य दिवस थाटात साजरा
कन्हान : - आयडियल एज्युकेशन सोसायटी कन्हान संचलित आदर्श हायस्कूल कन्हान व आयडियल कॉन्व्हेंट हिंदी प्राथमिक शाळेत ७९ वा स्वातंत्र्य दिवस थाटात साजरा करण्यात आला . संस्थेच्या अध्यक्षा सौ.पुष्पा आर द्विवेदी यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये व सचिव भरत सावळे यांच्या अध्यक्षतेखाली भारत माता आणि राष्ट्रपीता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन ध्वजारोहण करण्यात आले .
विद्यार्थ्यांनी देशभक्तीवर गीतांच्या गायनातून रंगारंग कार्यक्रम सादर केला . यावेळी संस्थेचे सचिव भरत सावळे यांनी त्यांच्या पालकांच्या स्मरणार्थ "श्यामली पुरस्कार" च्या माध्यमातून इयत्ता पहिली ते दहावी पर्यंत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविलेल्या 51 मुलांना रोख रक्कम दिली . कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदर्श हायस्कूल कन्हान चे मुख्याध्यापक गिरीजाशंकर यादव यांनी केले . विद्यार्थांनी स्वातंत्र्यलढ्याबद्दल आपले विचार मांडले.
ज्येष्ठ शिक्षक सोलंकी सर आणि प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.लता पेटकर संस्थेच्या सदस्या सौ.नीता मेश्राम , कुमारी छाया मिसार आणि संस्थेचे सदस्य घवघवेजी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करुन शुभेच्छा दिल्या . भरत सावळे यांनी सर्व विद्यार्थ्यांना देशभक्तीची भावना बाळगण्याचे आवाहन केले . विद्यार्थांना मिठाई वितरित आणि राष्ट्रगीत गायन करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .
कार्यक्रमाचे सुत्र संचालन मनोज डोंगरे यांनी केले आणि आभार प्रदर्शन अलंकार राखडे यांनी केले .कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले .
देशभक्तीवर गीतांच्या गायनातून ७९ वा स्वातंत्र्य दिवस थाटात साजरा | 79th Independence Day celebrated with patriotic songs
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर
0 टिप्पण्या