Advertisement

कामगार कल्याण केंद्र कन्हान येथे ७९ वा स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा |


कामगार कल्याण केंद्र कन्हान येथे ७९ वा स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा

कन्हान : - महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट क्रमांक एक अंतर्गत कामगार कल्याण केंद्र कन्हान येथे ७९ वा स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .

कार्यक्रमाचे अध्यक्ष युवा पत्रकार ऋषभ बावनकर , प्रमुख पाहुणे शंकर कारेमोरे , आशिष बागडे , रंजना बोरकर , वनिता कावडे  उषा बंड यांच्या हस्ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर , राष्ट्रपीता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात . 

मान्यवरांचा हस्ते ध्वजारोहण करुन तिरंगा झेंडाला सलामी देऊन राष्ट्रगीत गायन करण्यात आले . मान्यवरांनी उपस्थितांना स्वातंत्र्य दिवसा वर मार्गदर्शन करुन शुभेच्छा दिल्या . लहान मुलांना लड्डु वितरित करुन स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रंजना पौनीकर  यांनी केले . कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रेरणा कावळे यांनी सहकार्य केले.


कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या