Advertisement

कन्हान परिसरात ७९ वा स्वातंत्र्य दिवस ध्वजारोहण करून विविध कार्यक्रमाने उत्साहात साजरा


कन्हान परिसरात ७९ वा स्वातंत्र्य दिवस ध्वजारोहण करून विविध कार्यक्रमाने उत्साहात साजरा

कन्हान : - कन्हान परिसरातील शाळा , महाविद्यालय , शासकिय कार्यालय , राजकिय , सामाजिक व सेवाभावी संस्थे व्दारे विविध कार्यक्रमासह ध्वजारोहण करून ७९ वा स्वातंत्र दिवस भोग्या उत्साहाने साजरा करण्यात आला . 


वराडा येथे स्वातंत्र्य दिन उत्साहाने साजरा

वराडा ग्राम पंचायत येथे शुक्रवार (दि.१५) ऑगस्ट ला सर्व प्रथम सरपंच सुनिल जामदार यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण आणि ध्वजारोहण करुन उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या . जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थांना छत्री आणि सर्पमित्रांना सर्प पकडण्यास सुरक्षा साहित्य किट वाटप करुन स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी उपसरपंच भोजराज काकडे, पोलीस पाटील संजय नेवारे, माजी उपसभाप ती देवाजी शेळकी, सर्पमित्र आशिष वरकडे, प्रणय लंगडे, रोशन जामदार, कृणाल देऊळकर, सतिश लंगडे सह ग्रामस्थ नागरिक बहु संख्येने उपस्थित होते.


अखिल भारतीय मांग-गारूडी दलित आदिवासी भटके संघर्ष समिती


झेंडा चौक पवार हाउस जवळ विष्णुलक्ष्मी नगर तारसा रोड, कन्हान येथे अखिल भारतीय मांग-गारूडी दलित आदिवासी भटके संघर्ष समिती आणि एम.जी. एस. स्पोटींग शिक्षण संस्था, कन्हान यांच्या सयुक्त विद्यमाने संस्थेचे अध्यक्ष मा. नेवालाल पात्रे यांच्या अध्यक्षेत व प्रमुख अतिथी माजी जि प सदस्य मा. अंबादास खंडारे यांच्या हस्ते महापुरूषाच्या प्रतिमेचे पुजन करून ध्वजारोहन करून स्वातंत्र दिन सोहळा साजरा करण्यात आला. याप्रसंगी नेवालाल इंचुलकर, विक्रम पात्रे, दलजित पात्रे, प्राण नाडे, मंगलसिंग लोंढे, शेषराव नाडे, देवानंद पेटारे, अर्जुन पात्रे, शैलेश पात्रे, सागर पात्रे, विक्रम उमे, अंजली गायकवाड, विशाखा पात्रे, दिव्या पात्रे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. या वेळी मा. अंबादास खंडारे, महेंद्र खडसे, रघुनाथ पात्रे हयानी मार्गदर्शन केले. 

तर नेवालाल पात्रे यानी अध्यक्षिय मार्गदर्शनात स्वातंत्र प्राप्ती करिता आपल्या समा जाचे सुध्दा महत्वाचे योगदान असुन स्वातंत्र्याच्या इति हासा विषयी संबोधित केले. कार्यक्रमाच्या यशस्विते करिता भाटिया पात्रे, आशिष कांबळे, वीर गायकवाड, बादल लोंढे, अजित पात्रे, रोहित खडसे, सुमित पुरवले, सुधाकर पात्रे, सुनिल भिसे, शिवराज उफाडे, शंभु खंडारे, सरजु खडसे, गोलु पुरवले, अर्जुन गायकवाड, रंजित खडसे, नाना पात्रे, राहुल गायकवाड, किशोर शेंडे, इन्दार पात्रे, नेवालाल खडसे, सुरेन्द्र शेन्डे, किम्मत पात्रे, रामनाथ लोंढे, जोगेदर पुरवले, जगलु हातागडे, रवि रोकडे, विजय गायकवाड, अनेश गायकवाड, जश वंत पुरवले, विजय शेन्डे, लखन पात्रे, जगीरा कामडे, सन्नी ठुनाडे, अजय इंचुलकर, सावन रोकडे, मेहेर इंचुरकर, सावन लोंढे, बलदेव नाडे, राजन पात्रे, शेखर पेठारे, अरविंद इंदुरकर, किरन पेठारे, रामाजी पात्रे, कोहिनुर हातागडे, सुधाकर भालेकर, अरविंद पात्रे, सतिश नाडे, विष्णुदास शेन्डे, रवि खडसे, लालचंद पात्रे, रविन्द्र लोंढे, भारत पात्रे, गौतम इंदुरकर आदीनी उपस्थित राहुन सहकार्य केले. 


जुनीकामठी येथे ध्वजारोहण करुन स्वातंत्र्य दिवस उत्साहाने साजरा


विदर्भ ढिवर समाज विकास संघ, जुनीकामठी व्दारे समाज भवनाच्या पटांगनावर ७९ वा स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. जि प शाळे चे मुख्याध्यापक पाटील सर यांच्या हस्ते व जुनी कामठी ग्राम पंचायत सरपंच, सचिव व पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत महापुरुषांच्या प्रतिमेला अभिवादन करुन ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी ज्ञानेश्वर उके, तुळशीराम बावणे , राजु मेश्राम, विठ्ठल उके, शिवा बावणे, गरिबा भोयर, विनायक उके, वैभव केवट, कैलास वरले, भीमराव वाघधरे सह गावकारी नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.


सर्वधर्म समभाव संघटन कन्हान


सर्वधर्म समभाव संघटन कन्हान द्वारे स्वातंत्र्य दिवस निमित्त कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक येथे करण्यात आले . कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांच्या हस्ते राष्ट्रपीता महात्मा गांधी , भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर , शहिद भगत सिंह यांचा प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली . यावेळी पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांनी स्वातंत्र्य दिवसा वर उपस्थितांना मार्गदर्शन करुन शुभेच्छा दिल्या . या प्रसंगी केतन भिवगड़े , नितिन मेश्राम , सचिन यादव , हरीभाऊ वानखेडे , मुकेश बागडे , विनोद मसार , दिलीप लिंबोने , दिलीप गजभिए , विद्यानंद सहारे , कमलेश नंदेश्वर सह आदि नागरिक उपस्थित होते .


सार्वजनिक वाचनालय हनुमान नगर कन्हान


सार्वजनिक वाचनालय हनुमान नगर कन्हान येथे ७९ वा स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .कार्यक्रमाचे अध्यक्ष वासुदेवराव चिकटे आणि प्रमुख पाहुणे सौ.छायाताई नाईक अध्यक्षा नगर सुधार समिती कन्हान यांच्या हस्ते राष्ट्रपीता महात्मा गांधी यांचा प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली . मान्यवरांचा हस्ते राष्ट्रीय ध्वजाचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले .ध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीत गायन करण्यात आले . मान्यवरांनी उपस्थितांना स्वातंत्र्य दिवसा वर मार्गदर्शन करुन शुभेच्छा दिल्या . प्रसाद वितरण करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली . कार्यक्रमाचे सुत्र संचालन श्याम बारई ग्रंथपाल यांनी केले आणि आभार प्रदर्शन कुणाल कोल्हे लिपिक यांनी केले . या प्रसंगी दिनकरराव मस्के , मनोहर कोल्हे , प्रकाशराव नाईक , पुरुषोत्तम कुंभलकर , मिलिंद वाघधरे , हरिभाऊ पडोळे , राहुल पारधी , अल्का कोल्हे , सौ. राजकन्या माटे , सौ. कल्पना श्रीखंडे , माया भोयर , सौ. सुनीता येरपुडे , सौ.मुन्नी चव्हाण सौ. पिंकू खंडाईत , सौ.प्रियंका वाघधरे , चेतना भोयर , युवानी कोल्हे , तक्ष कोल्हे , सुमित घोरपडे , गौरव बोरो , रमेश चित्रीव , गंगाधरराव अवचट सह आदि सभासद व वाचक उपस्थित होते .


कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या