Advertisement

भारतीय सैनिकांचा सत्कार करुन 79 वा स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा

भारतीय सैनिकांचा सत्कार करुन 79 वा स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा

कन्हान शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन 

कन्हान : - कन्हान शहर विकास मंच च्या वतीने 79 व्या स्वातंत्र्य दिवस निमित्त गांधी चौक येथे भारतीय सेवानिवृत्त आणि कर्तव्यावर असलेल्या सैनिकांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन  करण्यात आले .
कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त सैनिक जयावंत गटपाडे , प्रमुख अतिथि मंच चे मार्गदर्शक भरत सावळे , सेवानिवृत्त सैनिक श्रवण चव्हान मराठी पत्रकार संघ कन्हान अध्यक्ष सुर्यभान फरकाडे , कन्हान ग्रामीण पत्रकार संघाचे सचिव सुनिल सरोदे , माजी नगरसेविका राखी परते यांच्या हस्ते भारत माता ,  भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर , राष्ट्रपिता महात्मा गांधी , छत्रपति शिवाजी महाराज , माजी सैनिक स्वर्ग. शामरावजी सावळे , शहिद प्रकाश देशमुख यांचा प्रतिमेला पुष्प हार अर्पण अभिवादन करून तिरंगा झेंड्याला सलामी देऊन राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली . 
यावेळी मान्यवरांनी उपस्थितांना स्वातंत्र्य दिवसा वर मार्गदर्शन करुन शुभेच्छा दिल्या . सेवानिवृत्त सैनिक विशाल देऊळकर यांनी सेनांच्या कार्याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले . सैनिक श्रवण चव्हान , नितेश गभणे , सम्राट पगारे , नरेश गभणे , मुकेश सोनेकर , अमित राऊत , आशिष सोनी , विशाल देऊळकर , अनिल सोनेकर , नितिन महाजन , शहिद प्रकाश देशमुख यांचा आई लीलाबाई देशमुख , भाऊ प्रदीप देशमुख यांचा शहर विकास मंच च्या पदाधिकाऱ्यांनी शाॅल आणि वृक्ष देऊन सत्कार केला . भारत माता की जय , स्वातंत्र्य दिन , चिरायु हो , वंदे मातरम् चा जयघोष करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली . कार्यक्रमाचे सुत्र संचालन आणि आभार प्रदर्शन मंच चे संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर यांनी केले .

या प्रसंगी ताराचंद निंबाळकर , प्रभाकर रुंघे , विठ्ठल मानकर , भारत पगारे , जेष्ठ पत्रकार कमल यादव , मोहन रंगारी , रविंद्र दुपारे , प्रदीप देशमुख , नारायण गजभिए , लक्ष्मण वाझे , माहेर इंचुलकर , सौरभ गावंडे , अभिषेक साखरे , सतीश बेलसरे , निखिल मेश्राम , साहिल सैय्यद , शुभम बावनकर अनुराग महल्ले , कृणाल राजपुत , मुकुल शिवरकर , लोकेश दमाहे , अर्जुन पात्रे , नाना ऊकेकर , माहेर इंचुलकर , अभय ऊके , रुजल मेश्राम , ऋषी देशमुख , जया हिवसे , राजकुमार पटले , सुरज वरखडे सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .

कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या