पारशिवनी तालुक्यांमध्ये नाल्यांची साफसफाई नसल्यामुळे जनतेच्या आरोग्यास धोका! याला जबाबदार खंड विकास अधिकारी जाधव यांनी ताबडतोब लक्ष देणे आवश्यक
पारशिवनी :- तालुक्यांमध्ये प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये नाल्यांची साफसफाई नसल्यामुळे जनतेच्या आरोग्यास धोका असुन काही ग्रामपंचायत अंतर्गत गावामधुन निघणारा कचरा हा कचराकुंडी मध्ये टाकण्या व्यक्तीरीकत तो कचरा रोड वरती टाकला जातो त्यामुळे जनतेच्या आरोग्यास धोका असुन पर्यावरणास पण यापासून धोका निर्माण झाला असून याकडे ग्रामपंचायत चे सरपंच, ग्रामसेवक आणि पंचायत समितीचे खंड विकास अधिकारी जाधव यांचे लक्ष नसल्यामुळे हे जनतेच्या आरोग्यासोबत खेळखेळत आहेत.
एवढेच नाहीतर खंड विकास अधिकारी जाधव यांना पारशिवनी तालुका प्रतिनिधी सतीश साकोरे यांनी उन्हाळ्यामध्ये सांगितले होते की पावसाळा लागण्या आधी सर्व ग्रामपंचायतीच्या नाल्यांची साफसफाई करणे आवश्यक असल्याची माहिती दिली होती पण यांनी आतापर्यंत त्या कडे लक्ष दिले नाही. जाधव यांनी ताबडतोब प्रत्येक ग्रामपंचायत चे दौरे करून समोरासमोर नाल्यांची साफसफाई करुन घेणे आवश्यक असुन ज्या ग्रामपंचायत मार्फत रोड वरती कचरा टाकलेला आहे. त्यांच्या वरती ताबडतोब कारवाई करणे आवश्यक आहे.
. एवढेच नाहीतर ज्या ग्रामपंचायत मध्ये कचराकुंडी ची व्यवस्था नाही. त्या ग्रामपंचायत ला ताबडतोब कचराकुंडी लावण्याचे आदेश देण्यात यावे अन्यथा ज्या गावांमध्ये बिमारया तयार झाल्यास सरपंच, ग्रामसेवक आणि पंचायत समिती चे खंड विकास अधिकारी जाधव यांच्या वरती कार्यवाही करण्यात येईल म्हणून जाधव यांनी ताबडतोब दौरे करून प्रत्येक गावामध्ये स्वतः च्या उपस्थिती मध्ये काम करुन घेणे आवश्यक आहे.अशी जनतेची मागणी आहे.
प्रतिनिधी-दशरथ आकरे
0 टिप्पण्या