Advertisement

पारशिवनी पंचायत समिती चे बांधकाम अधिकारी यांनी! ठेकेदाराला घेऊन केला घरकुल घोटाळा

पारशिवनी पंचायत समिती चे बांधकाम अधिकारी यांनी ठेकेदाराला घेऊन घरकुल घोटाळा करुन हे मालामाल झाले यांच्या वरती ताबडतोब कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

........................................

पारशिवनी तालुका प्रतिनिधी:- सतीश साकोरे आणि पारशिवनी शहर प्रतिनिधी प्रशांत सावरकर:-पारशिवनी तालुक्यांतील वराडा येथे घरकुल कामामध्ये भष्टाचार केल्याची माहिती दुर्गा वालचंद काळसरपे, हरिप्रसाद कुपाले, बकाराम फुगल धुरवे, श्रीराम झाडु कालसर्प, राजकुमार चौधरी, गिता शंकर कुभरे, मुलचद कोठे राहनार वराडा यांचे घरकुल प्रधान मंत्री आवास योजना ग्रामीण २०२३-२४ गवंडी प्रशिक्षण योजने अंतर्गत बांधकाम पारशिवनी पंचायत समिती चे बांधकाम अधिकारी जाधव यांनी स्वतः ठेकेदाराला ठेका देऊ बांधकाम केले ते घरकुल यांना एक लाख चाळीस हजाराचे असल्याची माहिती दिली तर काही दोन लाख पन्नास हजार रुपयांचे घरकुल असल्याची माहिती दिली.


         

     घरकुल बांधकामाचा ठेका आधी जैस्वाल ठेकेदाराला देण्यात आला होता नंतर पाटील यांना देण्यात आला होता पण हे घरकुल एक लाख चाळीस हजाराचे पण बनलेले नसुन याचे जे फाऊंडेशन बनवीले आहे. ते फक्त दिड फुटाचे खोदकाम असुन यांचे घरकुल च्या नावाने बांधकाम करून त्यांच्या कडुन पैसे घेऊन बांधकाम अधिकारी जाधव आणि ठेकेदार मोकडे झाले पण वरील लोकांचे घरकुल तयार झाले पण यांना आपले व आपल्या कुटुंबांचे जिव मुठीत घेऊन जगावे लागत आहे. हवेमुळे यांचे घर हालत असते एवढेच नाहीतर यांच्या घरावर ती तेरा फुटाचे टिनटाकलेले असुन त्या मुळे यांच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचे पाणी आतमध्ये येत असल्यामुळे आतमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी जमा राहुन ओली जागा राहत असल्यामुळे पाणी जमा राहुन ओली जागा राहत असल्यामुळे राहचे कसे असा प्रश्न तयार झालेला आहे. एवढेच नाहीतर आम्हाला कोडुन ठेवणयाकरीता एक लाख चाळीस हजाराचे हाल तयार करून दिले असल्याचे हि यांनी सांगितले पण त्या मध्ये यांना संडास आणि बाथरुम ही तयार करुन दिले नाही.



         हागणदारी मुक्त भारत या नियमानुसार यांनी कामतर केले नाही. उलट त्यांना दार अनन्या करीता पैश्याची मागणी करु लागले तर यांनी पैसे दिले नाही अश्या प्रकारे भष्टाचार यांनी केल्याची माहिती पारशिवनी तालुका प्रतिनिधी सतीश साकोरे पारशिवनी शहर प्रतिनिधी प्रशांत सावरकर आणि ढवलापुर प्रतीनीधी निर्मला मरकाम यांना प्राप्त झाली.असुन एवढेच नाहीतर शासनाने आम्हाला नविन घर बांधून दयावे व बाधकाम अधिकारी जाधव आणि खंड विकास अधिकारी जाधव आणि खंड विकास अधिकारी जाधव यांच्या पगारामधुन झालेल्या घोटाळ्याची कपात करून आमच्या नविन घरांचे बांधकाम करुन देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली असून आम्हाला न्याय न मिळाल्यास आम्ही सह कुटुंब पारशिवनी पंचायत समिती समोर आमरण करु अशी माहिती यांच्या कडुन प्राप्त झाली आहे.

पारशिवनी प्रतिनिधी-सतीश साकोरे , प्रशांत सावरकर


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या