हिरालाल पुरे हत्याकांडातील आरोपीला अटक
दोनशे रुपयाकरीता केली हत्या
पारशिवनी :- पारशिवनी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खंडाळा ( डुमरी) येथिल रहिवासी मूतक हिरालाल लक्ष्मण पुरे वय ५८ वर्ष यांची हत्या दिनांक ८/६/२०२५ च्या रात्री अज्ञात व्यक्तीने केलेली होती.
आरोपी ने धारदार हत्याराने पोटावर आणि गडयावर वार करुन जिवानीशी ठार केले होते पारशिवनी पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक २६०/२०२५ कलम १०३(१) भा. न्या.स अन्वये गुन्हा ची नोंद करण्यात आली आहे. आरोपी ला पकडण्याकरीता पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय अधिकारी रामटेक रमेश बरकते यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखा व उपविभागातील वेगवेगळी पोलीस पथके तयार करुन अंगांनी व दिशाने गुन्ह्याचा तपासाला सुरुवात केली.
यातील मुतक हा त्यांच्या साथीदारांसह खमारी उमरेड येथे शंकरपट पाहण्याकरिता पाहण्याकरिता गेला होता. तेथे त्यांच्या मध्ये काही विवाद होऊन त्यांच्या खुन झाल्याची शक्यता गुहीत धरुन पारशिवनी, रामटेक आणि देवलापार परिसरामधुन शंकरपट पाहण्याकरिता गेलेल्या लोकांकडे असुन चौकशी करण्यात आली. तसेच घटनास्थळावर मुतक येण्या पूर्वी काही इसम येथे दारु पित बसलेले होते. अशी माहिती मिळाल्याने एका पथका कडुन कसुन तपास केला असता दारु पिऊन येण्या पूर्वी तेथुन निघुन गेल्याची माहिती प्राप्त झाली या शिवाय मुतक हिरालाल पुरे हे नुकतेच सेवानिवृत्त झाले असल्याने त्यांच्या बँक खात्यावर पेन्शनची रक्कम जमा झाली होती.
त्यामुळे घर कुटुंब किंवा गावातील मित्र परिवार यांच्या सोबत त्यांच्या काही विवाद होता काय याची चाचपणी करण्यात आली त्यानंतर मयतास घटनास्थळा जवळील टपरीतील चाकुने मारले असल्यास त्या दिशेने तपास केला येण्या जाण्या च्या मार्गाने तपास सुरू केला परिसरातील सी.सी. टिव्ही फुटेज तपासनी व काही साक्षीदाराची विचार पुस केली असतां एक इसम गाडील पेट्रोल संपल्याने घटनास्थळावर व फोडलेल्या टपरी जवळ घटनेदरमयान रेगाळताना दिसल्याने सी.सी. टिव्ही फुटेज मधील त्या संशयीत इसमानाची फोटो साक्षीदाराने दाखवुन खात्री पटल्यानंतर त्या इसमानाचा सोध सुरू केला मनसर मध्ये त्या इसमानाने काही शी संपर्क केल्याचे स्पष्ट झाल्याने त्या इसमानाचा सोध घेऊन विचारपूस केली असता संशयीत इसमहा सुरज बिसन टेकाम रा. कच्चेखानी त. खैरलांजी जी. बालाघाट येथिल असल्याचे स्पष्ट झाले.
सदर इसम हा फिरतीवर मंजुरी करतो तो फोन वापरत नाही. असे माहीत झाल्याने त्यांची छायाचित्रासह शोध पत्रीका सर्व सोशल मीडिया वर प्रसारीत केली सर्व पोलीस पाटील यांची बैठक घेऊन ससयताचा सोध घेण्या बाबत सख्त सूचना दिल्या दिनांक १८/६/२०२५ रोजी घ्या रात्री सदरील इसम मौजा चिंचोली त.पारशिवनी परिसरात लपुन असल्याबाबत खबर मिळाल्याने पारशिवनी पोलीसांनी सांभाळा रचुन त्यास ताब्यात घेतले त्या नंतर आरोपी कडे गुन्ह्याची विचारपुस केली असतां त्यानें यातील मुतक इसम यांच्या कडे पेट्रोल करीता २०० रुपये मागीतले होते मात्र मुतक हिरालाल पुरे यांनी पैसे न दिल्याने त्याचा राग आल्याने त्यास ठार मारल्याचे कबुल करून त्यांच्या खिशातील पैसे घेऊन पेट्रोल टाकून तो नागपूर ला निघुन गेला असे सांगितले गुन्ह्याचा पुढील तपास पारशिवनीचे ठाणेदार राजेश कुमार थोरात यांच्या मार्गदर्शनामध्ये चालू असल्याची माहिती प्राप्त झाली.
पारशिवनी शहर प्रतिनिधी, सतीश साकोरे ,प्रशांत सावरकर
0 टिप्पण्या