Advertisement

कन्हान शहर विकास मंच आणि सकल हिंदू समाज द्वारे राजमात जिजाऊ यांचा रथांचे जल्लोषात स्वागत


कन्हान शहर विकास मंच आणि सकल हिंदू समाज द्वारे राजमात जिजाऊ यांचा रथांचे जल्लोषात स्वागत


कन्हान : - मराठा सेवा संघ संचालित जिजाऊ रथ यात्रेचे कन्हान नगरीत आगमन होताच कन्हान शहर विकास मंच आणि सकल हिंदू समाज कन्हान शहर यांचा संयुक्त विद्यमाने जल्लोषात स्वागत करण्यात आले .


मराठा सेवा संघ च्या माध्यमातुन जिजाऊ रथयात्रा अंतर्गत मराठा जोडो अभियान आयोजित केले आहे . बुधवार (दि.१६) एप्रिल रोजी राजमाता जिजाऊ यांचा रथ यात्रेचे कन्हान नगरीत आगमन होताचा कन्हान शहर विकास मंच आणि सकल हिंदू समाज कन्हान शहर द्वारे गांधी चौक येथे फुलाच्या वर्षाने शरबत वितरण करुन जल्लोषात स्वागत केले . यावेळी संस्थेच्या पदाधिकारी व सदस्यांनी रथात राजमात जिजाऊ यांचा प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन "तुमच आमच नात काय....जय जिजाऊ , जय शिवराय ....जय भवानी....जय शिवाजी चा जयघोष करुन अभिवादन केले . या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर , मार्गदर्शक भरत सावळे , प्रभाकर रुंघे , समाजसेविका मिना कळंबे , श्री संताजी अखिल तेली समाज संघटन कन्हान शहर अध्यक्ष सुनिल सरोदे , सकल हिंदू समाज कन्हान शहर अध्यक्ष शुभम बावनकर , लोकेश दमाहे , सौरभ गुरधे , नाना ऊकेकर , चिंतामनजी शेंडे , साहिल सैय्यद , योगेश चकोले , अर्जुन पात्रे , प्रदीप बावने , नारायण गजभिए , महेंद्र चव्हान , आनंद शर्मा , ऋषी देशमुख , सुरज वरखडे सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .


कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या