कन्हान शहर विकास मंच द्वारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
कन्हान : - भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती निमित्त कन्हान शहर विकास मंच द्वारे अभिवादन करण्यात आले .
कन्हान शहर विकास मंच द्वारे १४ एप्रिल भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक कन्हान येथे करण्यात आले . कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मंच चे नवनिर्वाचित सदस्य नयन गायकवाड यांचा हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळ्याला पुष्प हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली . मंच चे मार्गदर्शक भरत सावळे , नाना ऊकेकर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन चरित्र्यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले . मंच सदस्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळ्याला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत कार्यक्रमाची सांगता केली .
या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर , मार्गदर्शक भरत सावळे , सौरभ गुरधे , नाना ऊकेकर , चिंतामनजी शेंडे , नारायण गजभिए , सौरभ गावंडे , नयन गायकवाड , सुशील सावरकर , सुप्रित बावने , प्रदीप बावने , साहिल सैय्यद , अर्जुन पात्रे , सोनु खोब्रागडे , शाहरुख खान प्रामुख्याने उपस्थित होते .
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर
0 टिप्पण्या