Advertisement

कन्हान मध्ये जिजाऊ रथयात्रेचे जल्लोषात स्वागत


कन्हान मध्ये जिजाऊ रथयात्रेचे  जल्लोषात स्वागत


तुम्हचे आम्हचे नाते काय ? "जय जिजाऊ !  जय शिवराय ! " च्या घोषणेने परिसर निनांदला.  


कन्हान : - मराठा सेवा संघ संचालित जिजाऊ रथ यात्रा २०२५ ही सकाळी आगमन होताच कामठी , कन्हान , कांद्री , टेकाडी , वराडा व पारशिवनी शहरात आगमण होताच मराठा सेवा संघ , शिवप्रेमी समाज बांधवा व्दारे तुम्हचे आम्हचे नाते काय ? "जय जिजाऊ !  जय शिवराय ! " च्या घोषणेने जल्लोषात भव्य स्वागत करण्यात आले .


मराठा सेवा संघा द्वारे संपुर्ण महाराष्ट्रात जिजाऊ रथयात्रा संस्थापक अध्यक्ष अँड. पुरुषोत्तम खेडेकर यांच्या संकल्पनेतुन दि.१८ मार्च ला वेरूळ येथुन निघुन संपुर्ण महाराष्ट्रात फिरून १ मे महाराष्ट्र दिनी लाल महाल पुणे येथे पोहचेल व रथयात्रेचे समापन होईल. नागपूर जिल्ह्यात रथयात्रा १३ एप्रिल पोहचली नागपुर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात व अनेक गावातुन रथ यात्रा मार्गक्रमण करताना शहरात व ग्रामीण भागात रथयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी भव्य स्वागत करण्यात आले. मधुकर मेहकरे, सौरभ खेडकर, प्रेमकुमार बोके, दिलीप चौधरी आदीनी जागो जागी रथयात्रेचे महत्त्व समजावुन सांगितले. शेतकरी, तरुण, महिला व विद्यार्थ्यांचे प्रश्न यावर जागृती निर्माण करण्याकरिता रथयात्रा काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ही रथयात्रा बहुजन व मराठा समाजाला एकत्र जोडण्याकरिता असुन, तोडणाऱ्या प्रवृत्तीला विरोध या यात्रेचा उद्देश असल्याचे सांगितले. जिजाऊ रथयात्रा समन्वयक अरविंद गावंडे, म.से.संघ महासचिव मधुकरराव मेहकरे, संभाजी ब्रिगेड महासचिव सौरभ खेडेकर, डॉ. गजानन पारधी यात्रे दरम्यान उपस्थित होते.


मराठा सेवा संघ लॉन नागपुर येथुन ऑटोमेटिव्ह चौक नागपुर ते नवीन कामठी पोलीस स्टेशन सामोरून शिवाजी चौक कामठी येथे शिवरायांना व जिजाऊ प्रतिमेस माल्यार्पण करून एकनाथ लांजेवार, मुकेश चकोले, आय रहमान सह नागरिकांनी स्वागत केले . जयस्तंभ चौकातुन महामार्गाने बावनकुळे यांचे घराजवळ मेन रोड कामठी येथे तेजस बहुउद्देशिय संस्थेचे चंद्रशेखर बावनकुळे, शाहिर राजेंद्र बावनकुळे मित्र परिवार व्दारे स्वागत करण्यात आले . 


कन्हान शहरातील राष्ट्रीय महामार्गा वर विवेकानंद सेवा मंडळ चॅरिट्री ट्रस्ट व ग्रामौन्नती प्रतिष्ठाण व्दारे स्वागत करून शरबत वितरण करण्यात आले. आंबेडकर चौक येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेस माल्यार्पण करून पुढे यात्रेचे छत्रपती शिवराय चौक तारसा रोड टी पॉंईट कन्हान येथे मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड कन्हान व्दारे भव्य स्वागत व कॉनर सभा संपन्न घेत चिप्सचे पॉकिट व चाय वितरण करण्यात आले. 


कांद्री येथे चेतक पोटभरे मित्र परिवार व्दारे स्वागत करून थंड मठा वितरण करण्यात आले.  टेकाडी बस स्टाप येथे संभाजी ब्रिगेडचे सुरेश हुड मित्र परिवार  व्दारे स्वागत करण्यात आले. वराडा बस स्टाप येथे सरपंच सुनिल जामदार , अमोल देऊळकर व्दारे स्वागत करून पुढे आमडी फाटा मार्गे पारशिवनी येथे गांधी चौकात बबनराव झाडे, जगदीश मोहोड, दिवाकर भोयर सह मराठा सेवा संघ व शिवप्रेमी व्दारे भव्य स्वागत व चाय नास्ता करून पुढे खापा मार्गे शिवतिर्थ येथे स्वागत, जेवण नंतर सावनेर, कळमेश्वर वरून काटोल ला सायंकाळी स्वागत, सभा होऊन पुढे रात्री कारंजा येथे मुक्काम करण्यात आले  .          


नागपुर जिल्हयात जिजाऊ रथयात्रा यशस्विते करिता नागपुर जिल्हाध्यक्ष प्रशांत मोहोड, शहराध्यक्ष प्रमोद वैद्य, जिल्हा सचिव बाळनाथ मानकर, सचिव पंकज निंबाळकर, अंगद काळे, पुरूषोत्तम कडु , जिजाऊ ब्रिगेड प्रदेश उपाध्यक्ष जया देशमुख, विभागीय अध्यक्ष सिमा टालाटुले, सुनिता जिचकार, जिल्हाध्यक्ष स्वाती शेंडे, नंदा देशमुख, प्रणाली दळवी, अनिता ठेंगरे, वैशाली कोहळे, अरूणा भोंडे, कन्हान अध्यक्ष मायाताई इंगोले, छायाताई नाईक, लता जळते,  संभा जी ब्रिगेड शहराध्यक्ष प्रताप पटले, ग्रामिण अध्यक्ष संजय कानतोडे, दिलीप खोडके, श्याम डहाके, शांतारा म जळते, मोतीराम रहाटे, ईश्वर डहाके, ताराचंद निंबाळकर, विठ्ठल मानकर, संदीप कुकडे, राकेश घोडमारे, सचिन साळवी, ऋषभ बावनकर, चेतक पोटभरे आदीं सह मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड आणि शिवप्रेमीनी सहकार्य केले.


कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या