Advertisement

जगायचे तर शिवरायांसारखे शौर्याने व मरावे छत्रपती संभाजी राज्यांसारखे - शांताराम जळते


जगायचे तर शिवरायांसारखे शौर्याने व मरावे छत्रपती संभाजी राज्यांसारखे - शांताराम जळते


जिजाऊ , शिवराय , संभाजी राजे यांचे विचार लक्षात घेऊन तरुणांनी समाजाला जागृत करावे - मायाताई इंगोले


कन्हान : - मराठा सेवा संघ कन्हान द्वारे छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्य जगायचे तर शिवरायांसारखे शौर्याने आणि मरावे छत्रपती संभाजी राज्यांसारखे चा संदेश देत जयंती थाटात साजरी करण्यात आली .


मराठा सेवा संघ कार्यालय राम नगर कन्हान येथे राष्ट्रमाता जिजाऊ , छत्रपती शिवाजी महाराज व महापुरूष आणि छात्रवीर राजे संभाजी महाराजांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते मालार्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली . यावेळी प्रमुख मार्गदर्शक शांताराम जळते यांनी संभाजी महाराज यांनी समाजासाठी केलेला त्याग आपल्या वक्तव्यातुन समजावुन सांगितले . संभाजी महाराजांना अगदी लहान वयातच मोगलांनी केलेले आक्रमनाचा सामना करावा लागला . संभाजी राजांनी केलेल्या लढ्याया . मोगलावर वचक निर्माण करून औरंजेबावर दहशत निर्माण केली . संभाजी कडील काही मंडळी फितपर झाली . त्या कारणाने संभाजी औरंजेबाच्या तावडीत सापडले . संभाजी राजांनी महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी स्वतःचे बलिदान दिले , आपल्या राज्यातील गुपिते सांगितले नाही . म्हणुन "जगायचे तर शिवरायांसारखे व मरावे तर संभाजी राज्यांसाखे" असे शांताराम जळते हयांनी व्यक्त केले. 


कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन जिजाऊ ब्रिगेड च्या अध्यक्षा शिवमती मायाताई इंगोले यांनी जिजाऊ , शिवराय , संभाजी राजे यांचे विचार लक्षात घेऊन तरुणांनी समाजाला जागृत करावे असे आवाहन केले . संदीप कुकडे यांनी संघटना वाढीसाठी समाज बांधवानी सहकार्य करावे असे आवाहन केले. 


कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संभाजी ब्रिगेडचे गायक कलाकार राकेश घोडमारे यानी तर आभार संदीप कुकडे यानी मानले . 


कार्यक्रमात मराठा सेवा संघांचे ताराचंद निबाळकर , विठ्ठल मानकर , वसंतराव इंगोले मोतीराम रहाटे , शिवशंकर वाकुडकर , चंद्रशेखर ठवकर , मनिष काकडे , राजेंद्र गाडगे , योग प्रशिक्षण जितेंद्र चौधरी , निखिल पाटील , राकेश सावरकर , जिजाऊ ब्रिगेड च्या महिला सदस्य लता जळते , बी.आर.एस पी चे प्रविण सतदेवे सह आदि मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते .


कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या