अवैध रेतीची वाहतूक करणारे चार ट्रक पकडले , कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त
चार अटक , उपविभागीय पोलीस अधिकारी आणि कन्हान पोलीसांची संयुक्त कारवाई
कन्हान : - कन्हान शहरातील जुने कन्हान पोलीस स्टेशन इमारतीच्या बाजुला राष्ट्रीय महामार्गा वर उपविभागीय पोलीस अधिकारी कन्हान आणि कन्हान पोलीसांनी संयुक्तपणे नाकाबंदी करुन अवैध रेती वाहतुक करणाऱ्या चार ट्रक ला पकडले . या कारवाईत पोलीसांनी कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त करुन अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कार्यवाही केली आहे .
प्राप्त झालेल्या माहिती नुसार शनिवार (दि.१९) एप्रिल रोजी रात्री १० वाजता च्या दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड आणि कन्हान पोलीस अवैध धंद्यावर कारवाई करने कामी परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदारा कडुन माहिती मिळाली कि मनसर कडुन कन्हान कडे काही वाहन अवैध रेतीची वाहतुक करीत येत आहे . अश्या मिळालेल्या माहिती वरुन उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड , कन्हान पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील आणि पोलीस कर्मऱ्यांनी जुने कन्हान पोलीस स्टेशन इमारतीच्या बाजुला राष्ट्रीय महामार्गा वर नाकाबंदी केली असता चार संशयित ट्रक पोलीसांना आढळुन आले .
ट्रक क्रमांक एम एच ४० सीटी ७७१७ , एम एच ३६ जे ४०६१ , एम एच बी एफ ८१९१ , एम एच ३६ एए १५१८ ला थांबवुन पोलीसांनी वाहनाची पाहणी केली असता ट्रक मध्ये मोठ्या प्रमाणात रेती दिसुन आली . पोलीसांनी ट्रक चालकांना रेतीच्या राॅयल्टी संदर्भात विचारणा केली असता , त्यांचाकडे कोणतीही वैध कोणतीही वैध कागदपत्रे दिसुन आले नाही .पोलीसांनी तात्काळ कारवाई करत चार ट्रक किंमत ९९,००००० आणि २५ ब्रास रेती किंमत १,२५,००० असा एकुण १०,०२५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला .
या प्रकरणात पोलीसांनी अक्षय रतेन्द्राकुमार नागेश्वर (वय २९ रा.पीली नदी नागपुर) , नितिन अशोक नेवारे (वय २७ रा.डोडमाझरी,आमगाव,दिघोरी) आकाश सुनिल कनोजे (वय ३० रा.कामठी) , सुरेंद्र योगेश्वर ठाकरे (वय २५ रा.कामठी) यांना अटक करुन त्याचा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे .
सदर कारवाईचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड , पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे .
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर
0 टिप्पण्या