Advertisement

वादळी वाऱ्यामुळे गोर्लेगाव शिवारातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान


वादळी वाऱ्यामुळे गोर्लेगाव शिवारातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान


दिनांक 16  मे रोजी सुटलेल्या वादळी वाऱ्यामुळे गोर्लेगाव शिवारातील अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. गावामध्ये घरांना अडून हवेचा वेग कमी होतो पण त्या उलट शेतामध्ये हवेचा वेग कमी होण्यास काही अडथळा नसतो. त्यामुळे हवेचा वेग शेत शिवारामध्ये मोठ्या प्रमाणात असतो. 

त्यामुळे 16 मे रोजी झालेल्या वादळी वाऱ्याने कुणाचे शेड वरील पत्रे तर कुणाच्या शेतात बसवलेल्या सोलार पंपाच्या सोलार प्लेट मोडून फुटून गेल्या आहेत.

Farmers in Gorlegao Shivar suffer huge losses due to stormy winds

    त्यापैकीच तुकाराम माधवराव चव्हाण या शेतकऱ्याने त्याच्या शेतातील बोअर वर GK ENERGY कंपनीचा सोलार पंप बसवलेला होता. तो 16 मे रोजी अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने कोसळून पडल्याने त्याच्या  दोन सोलार पॅनल चे फुटून त्याचे नुकसान झाले आहे.   त्याच्या झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई कंपनीकडून मिळावी अशी मागणी नुकसान शेतकऱ्याने केली आहे.

tukaram chavhan, nanded



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या