शिवकालीन शस्त्र कलाचे प्रदर्शनाने छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव थाटात
कन्हान : - शिवशंभु आखाडा आणि सकल हिंदू समाज कन्हान शहर यांचा संयुक्त विद्यमाने वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्मोत्सव निमित्त दत्त मंदिर कांद्री येथे शिवकालीन शस्त्र कला प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .
कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित जेष्ठ मार्गदर्शक अजय खेडघरकर , इंद्रपाल वंजारी आणि सकल हिंदू समाज कन्हान शहर अध्यक्ष शुभम बावनकर यांचा हस्ते छत्रपती संभाजी महाराज , छत्रपती शिवाजी महाराज , राजमाता जिजाऊ मां साहेब यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण , दीप प्रज्वलन आणि शस्त्र पुजन करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली .
अजय खेडघरकर , इंद्रपाल वंजारी यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचा जीवन चरित्र्यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले . कार्यक्रमात शिवशंभु आखाड्यांचा खेळाडुंनी आपल्या कौशल्यपुर्ण व विविध खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करुन उपस्थितांचे मन मोहित केले . प्रसाद वाटप करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली . कार्यक्रमाचे सुत्र संचालन ऋषभ बावनकर यांनी केले व आभार प्रदर्शन शिवशंभु आखाड्याचे कोच अनिकेत निमजे यांनी केले .
या प्रसंगी हिमांशु मंगर , तुषार उके , हिमांशु सावरकर , हर्षल सावरकर , हितेश राजपुत , सुधीर लोंढे सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर
0 टिप्पण्या