Advertisement

भारतरत्न इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय बारवीचा निकाल 92.20%


भारतरत्न इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय बारवीचा निकाल 92.20%

वाणिज्य शाखेचा ९५.७४% व कला शाखेचा ९०.६५% निकाल , गुणवतांचा सत्कार 

कन्हान : - कन्हान शहरातील रेल्वे स्टेशन रोड येथील नगर सुधार समिति द्वारा संचालित भारतरत्न इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय बारवीचा निकाल ९२.२० टक्के लागला. 

या मध्ये वाणिज्य शाखेचा निकाल ९५.७४ टक्के व कला शाखेचा निकाल ९०.६५ टक्के लागल्याने महाविद्यालय कडुन गुणवतांचा सत्कार करण्यात आला . महाविद्यालयातुन वाणिज्य शाखेत प्रथम गौरव सोमनाथ मरसकोल्हे ८०.६७% , द्वितीय ७७.१७% , तृतीय त्रिशा प्रमोद पाटील ६७.६७% घेऊन बाजी मारली . 

कला शाखेत प्रथम सुरक्षा सुभाष वैद्य ७३.५०% , द्वितीय मानसी सुधाकर भोस्कर ६९.८३% , तृतीय सोनाली श्रावण शेंडे ६८.३३% बाजी मारली . गुरुवार (दि.८) मे रोजी महाविद्यालयात कला व वाणिज्य शाखेतील प्राविन्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम पार पडला . 

महाविद्यालय चे प्राचार्य सचिन बनकर यांचा हस्ते गुणवतांचा सत्कार करण्यात आला . शिक्षक प्रेमदास पोटभरे , आशिष सायरे , शिक्षिका वर्षा शिंगाडे , सारिका गाणार , रंजना मेश्राम यांनी विध्यार्थ्यांना भविष्याचे मार्गदर्शन करुन शुभेच्छा दिल्या . 

तसेच शिक्षकेतर कर्मचारी रतन रेखाते , विजय वाघधरे यांनी शुभेच्छा दिल्या सोबत विद्यार्थ्यांचे पालकांचे अभिनंदन केले .

कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या