Advertisement

बळीरामजी दखने हायस्कुल दहावीचा निकाल ८७.१२% , गुणवंत विद्यार्थांचा सत्कार


बळीरामजी दखने हायस्कुल दहावीचा निकाल ८७.१२% , गुणवंत विद्यार्थांचा सत्कार


 कन्हान : - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल मंगळवार (दि.१३) मे रोजी जाहिर केला . या निकालात कन्हान शहरातील बळीरामजी दखने हायस्कुल येथील दहावीचा निकाल ८७.१२% राहिला . या मध्ये शाळेतुन प्रथम कनिष्का प्रशांत बंसोड ८७.८०% , द्वितीय श्रावणी ठवरे ८४.८०% , तृतीय मानसी दुलीचंद गडे ८४.६०% , चतुर्थ अर्थव कैलाश गिऱ्हे ८१.० , पंचम कृतिका देवानंद गोडे ७८.४०% घेऊन बाजी मारली . गुरुवार (दि.१५) मे रोजी शाळेत प्रथम दहा गुणवंत विद्यार्थांचा सत्कार कार्यक्रम पार पडला. शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानप्रकाश यादव यांच्या हस्ते गुणवतांचा सत्कार करण्यात आला . शिक्षक , शिक्षिकांनी विद्यार्थ्यांना भविष्याचे मार्गदर्शन करुन शुभेच्छा दिल्या . या प्रसंगी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र खंडाईत , बखारी ग्राम पंचायत सरपंच शोभाताई ढोने ,  किशोर संगई , पर्यवेक्षक सचिन अल्लडवार , यतिनकुमार पशीने , नागोराव चव्हाण , अमित थटेरे , त्रिशुल गवळी , हरिहर डहारे , सह आदि शिक्षक , शिक्षिका आणि कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते .


कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या