कन्हान ग्रामिण मधुन कर्जमुक्तीचे ८१ अर्ज सादर
कन्हान ग्रामीण मधुन कर्जमुक्ती अर्ज' देण्यासाठी उत्सफुर्त प्रतिसाद.
तहसीलदाराने निवेदन घेऊन सहाय्यक निबंधकास कर्जमुक्ती अर्ज स्विकारण्यास सांगितले.
कन्हान : - रयतेचे राजे छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती दिनी शेतकरी नेते व किसान ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष प्रकाशभाऊ पोहरे यांच्या आवाहनाला शेतकऱ्यांनी उत्सफुर्त प्रतिसाद देत कन्हान ग्रामीण भागातुन पारशिवनी तहसीलदारांना शेतकऱ्यांच्या यादीसह निवेदन देऊन सहाय्यक निबंधक कार्यालयात मागेल त्यालाच/गरज त्यालाच कर्जमुक्तीचे ८१ अर्ज सादर करण्यात आले .
बुधवार (दि.१४) मे २०२५ ला रयतेचे राजे छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती दिनी देशौन्नती चे मुख्य संपादक व शेतकरी नेते आणि किसान ब्रिगेड चे संस्थापक अध्यक्ष मा. प्रकाशभाऊ पोहरे यांच्या आवाहना ला उत्सफुर्त प्रतिसाद देत कन्हान ग्रामीण भागातुन पारशिवनी तहसील मध्ये शेतकरी पोहचुन अर्ज सादर करण्यास गेल्यावर टाळाटाळ करण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने पारशिवनी तहसीलदार सुभाष वाघचोर यांना भेटले असता त्यांनी शेतकरी कर्जमुक्ती अर्ज घेण्यास शासनाचे निर्देश नसल्याने आम्हच्या कडे शेतकऱ्यांच्या नावाच्या यादी सह निवेदन द्या . ते वरिष्ठाकडे पाठवु असा सल्ला देऊन सहाय्यक निबंधक पालेकर यांना फोन करून कर्जमुक्तीचे अर्ज स्विकारण्यास सांगितले .
या प्रसंगी देशौन्नती कन्हान प्रतिनिधी मोतीराम रहाटे , पत्रकार कमलसिंह यादव , किसान ब्रिगेडचे राहुल वानखेडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने शेतकऱ्यांच्या नावाच्या यादीसह निवेदन तहसीलदार सुभाष वाघचोर आणि नायब तहसीलदार रमेश पागोटे यांना कर्जमुक्तीचे ८१ शेतकऱ्यांच्या नावाच्या यादी सह निवेदन सादर केले . शिष्टमंडळात पवन काठोके , रामु लांडगे , सुभाष देऊळकर , भोजराज दुधुके , मनोज गुडधे , बंडुजी मानवटकर , अनंता मानवटकर प्रामुख्याने उपस्थित होते .
त्यानंतर सहाय्यक निबंधक पारशिवनी कार्यालयात मागेल त्यालाच/गरज त्यालाच कर्जमुक्तीचे कन्हान - ५ , पिपरी - २ , वाघोली - ३ , तेलनखेडी - २ , बोरडा - ०८ , निलज - ५ , केरडी - ३७ , येसंबा - १ , वराडा - १५ , गहुहिवरा - ३ असे एकुण ८१ अर्ज सादर करण्यात आले .
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर
0 टिप्पण्या