दंतरोग , मुखरोग शिबीरात ६० नागरिकांची तपासणी
राज्यस्तरीय सिलंबम स्पर्धेत ४ मेडल पटकविणाऱ्या शिवशंभु आखाडा खेळाडुंचा सत्कार
कन्हान : - कन्हान शहर विकास मंच च्या वतीने महाराष्ट्र दिवस , कामगार दिवस , मातृ दिवस आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्मोत्सव निमित्त भव्य दंतरोग , मुखरोग आणि निःशुल्क औषध वितरण शिबीर कार्यक्रमाचे आयोजन रविवार (दि.११) मे रोजी समाज भवन , हनुमान नगर , कन्हान येथे करण्यात आले .
कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित तेजस बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर अरगुलेवार , स्माइल प्लस डेंंन्टल क्लिनिक कन्हान येथील डॉ.हर्षल वाघमारे , जेष्ठ पत्रकार कमलसिंह यादव , शांताराम जळते , समाजसेविका जया हिवसे सह आदि मान्यवरांचा हस्ते आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज , राजमाता जिजाऊ मां साहेब , छत्रपती संभाजी महाराज , भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेला पुष्प हार अर्पण आणि मान्यवरांचे पुष्प गुच्छाने स्वागत करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली . यावेळी कन्हान शहर विकास मंच चे मार्गदर्शक भरत सावळे , चंद्रशेखर अरगुलेवार , शांताराम जळते यांनी महाराष्ट्र दिवस व छत्रपती संभाजी महाराज यांचा जीवन चरित्र्यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले .
दंतरोग , मुखरोग शिबीरात स्माइल प्लस डेंंन्टल क्लिनिक व इमप्लान्ट सेंटर कन्हान येथील डॉ.हर्षल वाघमारे आणि त्यांचा चंमुच्या सहकार्याने एकुण ६० नागरिकांच्या दातांची व तोंडाशी निगडीत असलेल्या आजाराची तपासणी करुन निःशुल्क औषध वितरण करण्यात आले . कार्यक्रमात शिर्डीत पार पडलेल्या राज्यस्तरीय सिलंबम स्पर्धेत एकुण चार मेडल जिंकून कन्हान शहराचे नाव रोशन करणाऱ्या शिवशंभु आखाड्याचे कोच अनिकेत निमजे , खेळाडु कु.जानवी पारधी , कु.निधी नाईक , कु.ऋतुजा वंजारी , कुमार.हर्षल ब्राॅझ यांचा भेट वस्तु देऊन सत्कार करण्यात आला . कार्यक्रमाचे सुत्र संचालन लोकेश दमाहे यांनी केले आणि आभार प्रदर्शन हिमांशु सावरकर यांनी केले .
या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच चे मार्गदर्शक भरत सावळे , नारायण गजभिए , श्री संताजी अखिल तेली समाज संघटन कन्हान शहर अध्यक्ष सुनिल सरोदे , जेष्ठ पत्रकार चंद्रकुमार चौकसे , आकाश पंडितकर , शुभम बावनकर , रविंद्र दुपारे , रमेश घोडघाटे , वामन देशमुख , लक्ष्मण वाझे , भुषण इंगोले , देवीदास पेटारे , प्रशांत मसार , चिंतामनजी शेंडे , राहुल ढोके सह आदि नागरिक उपस्थित होते .
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर , लोकेश दमाहे , हिमांशु सावरकर , साहिल सैय्यद , सौरभ गावंडे , अर्जुन पात्रे , सुशील ठकारे , राजेश मेश्राम , नाना ऊकेकर , प्रदीप बावने , प्रफुल गिऱ्हे , निखिल मेश्राम , अभिषेक साखरे , हर्ष झा , आयुष संतापे , माहेर इंचुलकर सह आदि सदस्यांनी सहकार्य केले .
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर
0 टिप्पण्या