Advertisement

दहशतवादी हल्ल्यात मृत्यु झालेल्या पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली


दहशतवादी हल्ल्यात मृत्यु झालेल्या पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली 


कन्हान : - सकल हिंदू समाज कन्हान शहर च्या वतीने तारसा रोड शहिद चौक येथे जम्मू-काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला व मृत्युमुखी पर्यटकांना  भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली .


मंगळवार (दि.२२) एप्रिल रोजी जम्मु - कश्मीर मधील पहलगाम येथे पर्यटक स्थळावर दहशतवाद्यांनी अंधाधुंध गोळीबार केला . या हल्ल्यात २८ निष्पाप नागरिकांचा मृत्यु झाला . तर अनेक नागरिक जख्मी झाले आहेत . या घटनेनंतर देशभरात तीव्र संताप व्यक्त होत असुन विविध संघटने द्वारे निषेध व्यक्त करण्यात येत आहे . गुरुवार (दि.२४) एप्रिल रोजी सकल हिंदू समाज कन्हान शहर च्या वतीने तारसा रोड शहिद चौक येथे निषेध आणि श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित शक्ति ट्रांसपोर्ट चे मालक छोटु भैया यांच्या हस्ते शहिद प्रकाश देशमुख यांचा स्मारकावर पुष्प हार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले . यावेळी पाकिस्तान आणि दहशतवाद्यांचा विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली . दोन मिनटाचा मौन पाळुन दहशतवादी हल्ल्यात मृत्यु झालेल्या पर्यटकांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली . केंद्र शासनाने दहशतवाद्यांचा विरोधात तात्काळ  कठोर पाऊल उचलावे,अशी मागणी देखील करण्यात आली आहे . या प्रसंगी सकल हिंदू समाज कन्हान शहर अध्यक्ष शुभम बावनकर , शक्ति ट्रांसपोर्ट चे मालक छोटु भैया , ऋषभ बावनकर , सुजित सावरकर , अनिकेत निमजे , अजय पाली , अरुण कश्यप , अमन गुप्ता , दिनेश बरमैया , रेहान लोंढे , सुहान भाई , उदय माहोरे , आकाश गुप्ता ,लोकेश दमाहे , आनंद शर्मा , योगेश चकोले , नारायण गजभिए , आदित्य जयपुरकर सह आदि नागरिक उपस्थित होते .


कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या