जय श्री राम , जय जय श्री राम च्या जयघोषाने कन्हान शहर दुमदुमले
भव्य पालखी शोभायात्रा काढुन श्रीराम नवमी महोत्सव उत्साहात साजरा
कन्हान : - सकल हिंदू समाज कन्हान शहर च्या वतीने भव्य पालखी शोभायात्रा काढुन श्रीराम नवमी महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला . "जय श्री राम , जय जय श्री राम च्या जयघोषाने संपुर्ण कन्हान परिसर दुमदुमले असुन भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते .
रविवार (दि.६) एप्रिल रोजी श्रीराम नवमी निमित्त सकल हिंदू समाज कन्हान शहर द्वारे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . जुने कन्हान पोलीस स्टेशन च्या बाजुला शिव पंचायत हनुमान मंदिर येथे प्रभु श्रीरामाची विधिवत पूजा अर्चना करुन , भजन कीर्तन , हवन पूजन , हनुमान चालीसा पाठन , काकड आरती करण्यात आली . संध्याकाळी शिव पंचायत हनुमान मंदिर येथे श्रीरामाची आरती करुन भव्य पालखी शोभायात्रा काढण्यात आली . शोभायात्रेत शिवशंभु आखाडा संताजी नगर , कांद्री च्या तरुण मुला , मुलांनी आपल्या कलेचे प्रदर्शन करुन राम भक्तांचे मन मोहित केले .
शोभायात्रा महामार्ग ने डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक , तारसा चौक , सात नंबर नाका , शितला माता मंदिर येथे पोहचली असता वामन देशमुख , चंद्रशेखर बावनकुळे , संजय चौकसे , दिलीप मरघडे, गोकुल पटेल, अशोक खैरकर, प्रकाश ढोके, वसंता राउत, प्रेमचंद चव्हाण,चंदु ठाकरे सह आदि भाविकांनी फुलाच्या वर्षाने शरबत वितरण करुन पालखीचे स्वागत केले . धर्मराज शाळा , चक्रधर पेट्रोल पंप , तारसा चौक , गहुहिवरा चौक पांधन मार्गा ने गणेश मंदिर कन्हान येथे पोहचुन शोभायात्रेचे समापन करण्यात आले .
गणेश मंदिरात भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले . गणेश मंदिर पंच कमेटी यांचा सहयोगाने महाप्रसाद वितरण करुन श्रीराम नवमी महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला . शोभायात्रे दरम्यान कुठलीही अनुचित घटना घडु नये म्हणुन कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांचा नेतृत्वात पोलीसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता .
या प्रसंगी ज्ञानेश्वर दारोडे , शक्ती ट्रांसपोर्ट मालक छोटु भैया , लोकेश दमाहे , अतुल हजारे , राजेश पोटभरे , जीवंन मुंगले , शिवाजी चकोले , अतुल हजारे , शुभम यादव , सौरभ यादव , देवेंद्र बावनकर , वेदांत भनारकर , बादल विश्वकर्मा , नरेश पोटभरे , अमन यादव , उद्य माहुरे , शुभम चरडे , विनोद यादव , नरेश बावणे,वंश गोकुल पटेल, नरेंद्र ठवरे , सह आदि महिला आणि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते . शोभायात्रेच्या यशस्वितेकरिता आयोजक सकल हिंदू समाज कन्हान शहर अध्यक्ष शुभम बावनकर , ऋषभ बावनकर , हितेश राजपुत , हिमांशु सावरकर , हर्षल सावरकर , सार्थक पोटभरे , आयुष संतापे , रेहान लोंढे , जीवन नांदुरकर , सुजल यादव , ओम यादव , शिव यादव , सौरभ गावंडे , वेदांत राऊत , सुधीर लोंढे सह आदि भक्तांनी सहकार्य केले .
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर
0 टिप्पण्या