महान त्यागी बाबा जुमदेव जी यांचा जन्मदिवस सर्वत्र साजरा करत आला
पारशिवनी:- दरवर्षी प्रमाणे दिनांक ३/४/२०२५ ला महान त्यागी बाबा जुमदेव जी यांचा १०४ वा जन्म दिवस साजरा करण्यात आला.
मधुन रैली काढण्यात आली. त्या मध्ये हनुमान जी ची वैश भुषा तयार करण्यात आली होती. अध्यक्ष बाबुलाल भलावी यांच्या घरी सर्व सेवक आणि सेवीका यांच्या उपस्थितीमध्ये केक कापून विनंती करुन महाप्रसाद सर्व सेवक,सेवीका ना वाटप करण्यात आले.
चारगाव येथे रैली काढण्यात आली.बैबारे यांच्या घरुन रैली काढुन पालोरा आश्रम येथे रैली चे आगमन झाले. नंतर कन्हान येथिल रैली महेश बिसने यांच्या मार्गदर्शनाखाली काढुन पालोरा आश्रम येथे रैली चे आगमन झाले. अश्या प्रकारे तालुका यामध्ये व रामटेक तालुका यामध्ये बाबाजुमदेजी यांचा जन्मदिवस साजरा करण्यात आला त्याप्रसंगी लाखोंच्या संख्येने सर्व सेवक, सेवीका आणि बालगोपाल मोठ्या संख्येने पालोरा आणि दुधाळा आश्रम ला उपस्थित होते.
पालोरा येथिल कार्यक्रमा मंचावर वासुदेव बिसने मार्गदर्शन कन्हान, अध्यक्ष आकरे ताई पालोरा आश्रम, रमेश पाहुणे निलज,करेडमारेजी सावनेर, गजानन चिमुरकर रयवाडी, शिवाजी कनाडकर गोसेवाडी, श्रीराम वाहिले आजनी,सुरेश वंजारी कन्हान यांनी सेवक आणि सेवीका यांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्या नंतर महाप्रसाद वितरण करण्यात आले त्या वेळी शेषराव लांजेवार यांनी महाप्रसाद वितरण केले उपस्थित राऊत, बावनकुळे, साकोरे, नागपुरे,गाते, ठाकरे,भलावी,कभे,मेहर, लोहकरे, कुंभलवार, महाजन,खडाते यांनी नागपूर ते मुंबई एक्सप्रेस ला बाबा जुमदेव जी नाव देण्याची मागणी केली असुन शासनाने ताबडतोब लक्ष देणे गरजेचे आहे असे ही ते म्हणाले.
मंच वर उपस्तीत वासुदेवजी बिसने मर्ग्दर्श्क् कन्हन् अध्यक्ष आकरे बाई पलोरा आश्रम रमेशजी पाहुने निलज करेडमारेजी सावनेर गजाननजी चिमुरकर रयवाड़ी शिवाजी कनाडकर गोसेवाड़ी श्रीराम वाहिले आजनी सुरेशजी वंजारी कन्हान
The birth anniversary of the great ascetic Baba Jumdev Ji was celebrated everywhere
पारशिवनी प्रतिनिधी
सतीश साकोरे,प्रशांत सावरकर
0 टिप्पण्या