रामाकोना येथे लाखों सेवकांच्या उपस्थिती मध्ये सेवक सम्मेलन पार पडले
पारशिवनी :- छिदवाडा जिल्ह्यातील रामाकोना येथे महान त्यागी बाबा जुमदेव जी यांचा जयंती निमित्त सेवक सम्मेलन घेण्यात आले होते.
रविंद्र बनसोड यांच्या घरी सकाळी सात वाजेला हवन कार्य पार पडले त्या नंतर त्या नंतर भगवान बाबा हनुमानजी,महान त्यागी बाबा जुमदेव जी आणि वाराणसी आई यांची भव्य दिव्य रथ सौसर मधुन काढुन कार्यक्रम स्थळी रामाकोना येथे पोहचली
कार्यक्रमाचे स्थळ वनवासी सेवा मंडळ बाप्पा उच्च प्राथमिक विद्यालय पटांगण रामाकोना येथे कार्यक्रम घेण्यात आले. त्या नंतर कार्यक्रमांचे दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
मंचावर उपस्थित जयराम महाजन मार्गदर्शन व अध्यक्ष परमात्मा एक सेवा संस्था रामटेक, कार्यक्रमांचे उपाध्यक्ष मा. एच.टि.किरमे प्रमुख मार्गदर्शक व सेवा समिती लाजी अध्यक्ष, कार्यक्रमाचे उदघाक मा.रामदास मयुरे मार्गदर्शन रामटेक, मा.वासुदेवजी बिसने प्रमुख मार्गदर्शक कन्हान यांनी सर्व सेवक सेवीका यांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्या नंतर सत्कार मुर्ती यांचे सत्कार करण्यात आले.
त्यामध्ये मा.गिरीधर बरबे मार्गदर्शन वाडी,मा.अशोक नदनवार मार्गदर्शक शांती नगर नागपुर, यशवंत बाबु मोहोड अध्यक्ष उमरानाला,मा. भाऊराव चौधरी वरिष्ठ पत्रकार रामाकोना,मा.छोटेलाल यादोव उमरानाला यांचा सत्कार करण्यात आला. रथयात्रेचे उद्घाटन बालुभाऊ बुधे मार्गदर्शक, श्रीराम केळवदे मार्गदर्शक, महेश बिसने मार्गदर्शक कन्हान, गजानन चिमुरकर जेष्ठ सेवक, नामदेव राऊत मार्गदर्शक, रवींद्र तुरनकर जेष्ठ सेवक भिलेवाडा
कार्यक्रमाला उपस्थित लिगा,चनदगाव,छिदवाडा,सौसर कमाडकडी,निमनी,सररा,तिवसा,सालीमेटा,बडगोना,डि. पि.एस. स्कुल ,गोरेघाट, शक्कर झिरी,सोनमहु,इमलीखेडा,गुरयाढाना, नागपूर, ब्रम्हपुरी, रायपुर,तुमसर, गोंदिया, रामटेक, गडचिरोली प्रत्येक जिल्हा मधुन सेवक आणि सेवीका लाखोंच्या संख्येने उपस्थित होते.
त्या नंतर महाप्रसाद वितरण करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन रवींद्र कराडे मार्गदर्शक व अध्यक्ष,उपासे,घोटकर, रवींद्र बनसोड मार्गदर्शक व उपाध्यक्ष, योगेश बांधे कोषाध्यक्ष,रामजी फुलझेले सहसचिव, रामेश्वर चौधरी प्रेरणा सुत्र, सुभाष ठाकरे सदस्य,अनील ओक्टे सदस्य, महेश जी बिसने जेष्ठ मार्गदर्शक आणि बिस्सी परमपूज्य महान् त्यागी बाबा जुमदेव जी सेवक मंडळ लिंगा जिल्हा छिदवाडा ( म.प.) समस्त सेवक, सेवीका आणि बालगोपाल लाखोंच्या संख्येने उपस्थित होते.
सतीश साकोरे पारशिवनी तालुका प्रतिनिधी
0 टिप्पण्या