गांजा विक्री करणाऱ्या तरुणास पोलीसांनी पकडले
९०६ ग्रॅम गांजा सह एकुण ९०६० रुपयांचा मुद्देमाल जप्त.
कन्हान पोलीस डीबी पथकाची कारवाई
कन्हान : - टेकाडी गावात अमली पदार्थ गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला कन्हान पोलीसांच्या डीबी पथकाने पकडुन त्याचे विरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे .
प्राप्त माहिती नुसार मंगळवार (दि.८) एप्रिल ला सायंकाळी ५:३० ते ७:३० वाजता दरम्यान कन्हान पोलीस डीबी पथक परिसरात अवैध धंदे कारवाई करण्यास परिसरात पेट्रोलिंग करित असता गुप्त बातमी दाराकडुन माहिती मिळाली की, टेकाडी गावात हर्षल डांगोरे हा तरुण आपल्या राहते घरामध्ये अमली पदार्थ गांजा बाळगुन ग्राहकास विक्री करत आहे.
अश्या माहिती वरुन पोलीसांनी टेकाडी गावात जाऊन हर्षल डांगोरे च्या घरासमोर पाहणी केली असता तेथे एक इसम मिळुन आला. पोलीसांनी त्याला नाव गाव विचारले असता त्यांने आपले नाव हर्षल ऊर्फ प्रविण दत्तराज डांगोरे वय २३ रा. टेकाडी असे सांगितल्याने त्यास अंमली पदार्थाच्या खबरीबाबत सविस्तर माहिती देऊन पंचासमक्ष हर्षल याचे अंगझडती व घरझडती घेतली असता बैठक रुम मधील सोफ्याचा उजब्या बाजुला एक पिशवी मिळुन आली.
पिशवी मध्ये खुले असलेले हिरव्या व तपकिरी रंगाचे वनस्पती दिसुन आली. वनस्पतीचा पोलीसांनी वास घेतला असता गांजा असल्याची खात्री झाली. संपुर्ण गांजा वेगळा काढून वजन काट्याने मोप माप केले. गांज्याचे वजन ९०६ ग्रॅम व गांजा भरण्या करिता असलेली प्लॅस्टीकची पिशवी वजन १० ग्रॅम असा एकूण ९१६ ग्रॅम वजन अंदाजे किंमत ९०६० रुपये असा मुद्देमाल मिळुन आला.
जप्त केलेल्या गुंगी कारक वनस्पती गांजा एका प्लॅस्टीकच्या पन्नीमध्ये टाकुन ती पन्नी एका आकाशी रंगाच्या लिफाफात बंद करून त्यावर आमचे, पंचाचे सही असलेले लेबल लाखे द्वारे पोलीस स्टेशनच्या पितळी शिलने जागीच शिलबंद करण्यात आले. या प्रकरणी पोलीसांनी हर्षल ऊर्फ प्रविण दत्तराज डांगोरे ला अटक करुन त्याचे विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करित आहे .
सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांचा मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक राहुल चव्हान, हरिष सोनभद्रे, अमोल नागरे, सचिन वेळेकर, अनिल यादव, अश्विन गजभिये, जीवन विघे, मोहित झाडे, आकाश सिरसाट, सूरज कांबळे, महिला पोलीस कर्मचारी विना थूल सह आदि पोलीस कर्मचाऱ्यांनी कारवाई यशस्विरित्या पार पाडली .
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर
0 टिप्पण्या