Advertisement

भजन कीर्तनाने नवरात्र व श्रीराम नवमी उत्साहात


भजन कीर्तनाने नवरात्र व श्रीराम नवमी उत्साहात


कन्हान : - सियामानस भजन मंडळ कांद्री द्वारे विविध मंदिरात पुजा, अर्चना व भजन करून दोन दिवसीय भजन कीर्तनाने नवरात्र व श्रीराम नवमी उत्साहाने साजरी करण्यात आली.



सियामानस भजन मंडळ कांद्री द्वारे नवरात्र महोत्सव आणि श्रीराम नवमी निमित्त दोन दिवसीय भजन कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दुर्गा मंदिर कांद्री येथे पुजा अर्चना करून भजन कीर्तन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. महिलां नी श्रीराम मंदिर टेकाडी काॅलोनी, श्री हनुमान मंदिर कांद्री येथे विविध प्रकारचे भजन, कीर्तन करुन भक्तां ना मंत्र मुग्ध केले. आरती आणि प्रसाद वाटप करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. याप्रसंगी उज्व ला पोटभरे, मनिषा वाडीभस्मे, नलु पोटभरे, रेखा कामडे, रुपाली आकरे, मुन्नीबाई यादव, माधुरी चकोले , माधुरी विश्वकर्मा, इंदुबाई चकोले, शशिकला गायक वाड सह महिला प्रामुख्याने उपस्थित होत्या .


कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या