घराला आग लागल्यामुळे हजारो रुपयांचे नुकसान
पारशिवनी :- पासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या करभाळ येथे आज दिनांक ६/४/२०२५ ला दुपारी दोनच्या सुमारास शंकर विठोबा पाटील यांच्या घराला आग लागली असल्याचे कुणाच्या लक्षात आले नसल्यामुळे आग लागली.
यांच्या बाजुच्या घरी कमल शेंडे हे डिसचे काम होते त्या वेळी त्यांना घरामधुन धुर येतानी दिसले त्या वेळी त्यांनी स्थानिकांना एकत्रीत करुन त्यांच्या घराचे कुलूप तोडून स्थानिकांच्या सहकार्याने आग विझविणे सुरू केले.
पाण्याची कमतरता असल्यामुळे पाण्याची टँकर बोलावून आग आटोक्यात आणली तेव्हा पुवथवीराज चव्हाण, अशोक उके, मंगेश ढबाले आणि होमगार्ड सैनिक आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने आग विझविणयात आली त्या मध्ये ५० हजाराचे नुकसान झाल्याची माहिती प्राप्त झाली असून हि आग साटसरकिट मुळे लागली असल्याचे लक्षात आले.
पारशिवनी प्रतिनिधी सतीश साकोरे, प्रशांत सावरकर
0 टिप्पण्या