गिरीराज काटन मिल ला आग लागुन करोडो रुपये चे नुकसान
पारशिवनी:- पासून १० किलोमीटर अंतरावर असलेली गिरीराज काटन मिल ला आज सकाळी तीन वाजेला जे.सी.बी. च्या चिंगारी मुळें आग लागल्याची माहिती पवन सुदाने यांच्या कडुन माहिती प्राप्त झाली.
येथे आगविझविणया करीता अग्नी शामक सावनेर, रामटेक,पारशिवनी, कन्हान, उमरेड नगर परिषद, उमरेड डबलुसियल,वाडी, कामठी,मौदा व भंडारा येथुन बोलवण्यात आलेल्या होत्या बातमी प्रकाशित करीत असताना आग आटोक्यात आलेली नव्हती येथे अनुचित प्रकार घडू नये म्हणुन राजेश कुमार थोरात यांच्या मार्गदर्शनामध्ये चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला असुन पोलीस स्टेशन अरोली एक.पी.आय. स्नेहल राऊत यांच्या नेतृत्वात पि.एस.आय.शिवाजी भताने,पि.एस.आय. रामराव पवार, फौजदार देवानंद उकेबोदरे, आणि पारशिवनी पोलीस स्टेशन चे होमगार्ड तसेच देवलापार पोलीस स्टेशन चे पि.एस.आय.अमोल तांबे उपस्थित होते.
पारशिवनी प्रतिनिधी
सतीश साकोरे , प्रशांत सावरकर
0 टिप्पण्या