Advertisement

अवैध रेती वाहतुक करणारे चार ट्रक पकडले


अवैध रेती वाहतुक करणारे चार ट्रक पकडले


पाच आरोपी अटक , ९२ लाखांचा मुद्देमाल जप्त 


उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड यांची मोठी कारवाई 


कन्हान : - कन्हान शहरातील राष्ट्रीय महामार्गा वर ब्रुकब्रांड कंपनी समोर उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड आणि त्यांचा पोलीस पथकाने नाकाबंदी करुन अवैध रेती वाहतुक करणाऱ्या चार ट्रक ला पकडुन ९२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन नऊ आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे . उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड यांचा मोठ्या कारवाई मुळे रेती तस्कऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले असुन माफियांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे .


प्राप्त झालेल्या माहिती नुसार सोमवार (दि.७) एप्रिल रोजी दुपारी १२ ते २ वाजता च्या दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड आणि त्यांचा पोलीस पथक कन्हान परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदारा कडुन माहिती मिळाली कि रामटेक कडुन नागपुर च्या दिशेने अवैध रेतीची वाहतुक होत आहे . 

अश्या मिळालेल्या माहिती वरुन उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड आणि त्यांचा पोलीस पथकाने ब्रुकब्रांड कंपनी समोर नाकाबंदी केली असता त्यांना चार संशयित ट्रक दिसुन आले . पोलीसांनी ट्रक क्रमांक एम एच ४० सीएम ९७९६ , एम एच ४० सीटी ३५७८ , एम एच ४० सीटी ७२४७ , एम एच २७ बी एक्स ३३४३ ला थांबवुन पाहणी केली असता मोठ्या प्रमाणात रेती दिसुन आली . 

चार ही ट्रक चालकांना रेतीची राॅयल्टी बाबत विचारफुस केली असता त्यांचाकडे कोणतीही वैध कागदपत्रे नसल्याचे उघड झाले . 

उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड यांना अवैध रेतीची वाहतुक होत असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी पोलीस पथकासह तातडीने कारवाई करत चार ट्रक किंमत ९०,००, ००० रुपए  , ३१ ब्रास रेती किंमत १,६०,००० रुपए , ४ अॅनड्राईड मोबाइल ४०,००० असा एकुण ९२,००,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन आरोपी १) चंदन केशवरावजी मारबते (वय ३७) रा.खापरखेडा , २) मंगेश केने रा.कोराडी नाका , ३) पंकज प्रल्हाद भलावी (वय २५) ४) मंगेश अंबादास राऊत दोन्ही रा.डोंगरला पोस्ट उमरवाडा,तुमसर,भंडारा , ५) जयेश सुखदेव मते (वय २९) रा.खरबी , ६) सुनिल चकोले रा.तुमसर , ७) सचिन मोतीराम मेश्राम (वय ३६) , ८) मिलीद अरुणजी उद्धार दोन्ही रा.ह.मु.ईसापुर पिपळा , ९) आशिष जाधव रा.कन्हान यांचा विरुद्ध गुन्हा दाखल करून पाच आरोपी ला अटक केली आहे . सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड यांचा नेतृत्वात पोहवा सुभाष बेलेकर , पोना मुकेश रामेलवार , नितेश रोकडे , मुकेश यादव , शैलेश बेले सह आदि पोलीस कर्मचारी यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली .


कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या