जवाहर नवोदय विद्यालयामध्ये पार पडला वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा
........................................
पारशिवनी :- तालुक्यातील नवेगाव खैरी येथे पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयाच्या सभागृहामध्ये दिनांक १६/४/२०२५ ला सकाळी ११ वाजेला वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्याचे उदघाटन मा. संघमित्रा बोबडे उपनिरीक्षक पोलीस स्टेशन पारशिवनी यांच्या उपस्थितीत मध्ये कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
प्रमुख अतिथी विद्यालयाच्या प्राचार्या डा.जरीना कुरैशी यांनी सरस्वती प्रती मेला माल्या अर्पण व दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली सोबत कला प्रदर्शनीचे उदघाटन रिबीन कापुन करण्यात आले.
कला प्रदर्शनाचे अवलोकन करताना विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कलाकृती ची प्रमुख अतिथी व उपस्थितांनी कौतुक केले.या प्रसंगी विद्यार्थांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.यात भारताच्या विविध राज्यांतील नुत्य प्रकार सादर केले गेले यात असमचा बिहु राजस्थान चा लोकनूत्य गुजरात चा गरबा, महाराष्ट्राची लावणी इत्यादी नुत्य आनंद थुल संगीत शिक्षण यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केले गेले यानंतर पुरस्कार वितरण कार्यक्रमात विद्यालयाचे कैप्टन,खैल कैप्टन यांना पुरस्कार देण्यात आले.
सोबत वर्षे भर सुट्टी न घेता विदयालया मध्ये उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल देऊन गौरविण्यात आले.या शिवाय चित्रकला, संगीत,खैळ, विज्ञान व इतर स्पर्धा मध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थांना गोल्ड मेडल देऊन गौरविण्यात आले.
या प्रसंगी पारशिवनी पोलीस स्टेशन च्या उपनिरीक्षक संघमित्रा बोबडे यांनी विद्यार्थांचे कौतुक केले व नवोदय विद्यालयात ही गुणवंत विद्यार्थ्यांचा खाण आहे.देशातील प्रमुख अधिकारी हे नवोदय विद्यालयाचे विद्यार्थी असतात हे त्यांनी सांगितले, विद्यालयाच्या प्राचार्या डॉ जरीना कुरेशी यांनी पाहुण्यांचे आभार मानले.व विद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला या कार्यक्रमाला विद्यार्थांचे पालक उपस्थित होते.
आभारप्रदर्शन करताना उपप्राचार्य मोहित कुमार यांनी उपस्थित असलेल्या सर्वांचे आभार मानले तसेच कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता सहकार्य करणाऱ्या शिक्षकांचे आभार मानले कार्यक्रमांचे सुत्र संचालन जी.एस.भुजबळ यांनी केले, पुरस्कार वितरण शिक्षक पालक समीती च्या पदाधिकारी यांनी केले. उपस्थित निलेश गजभिये,मनोज कोसे, वाल्मीकी सहारे,कमल दायदार, विनोद गडपाल गुरुदेव कोरचे, सचिन नायक, अशोक कुमार, इत्यादी नी कार्यक्रमा करीता विशेष सहकार्य केले.भुषण मेश्राम, सुरेश ताडुलकर इत्यादी नी जलपान व्यवस्था केली.
पारशिवनी प्रतिनिधी सतीश साकोरे आणि प्रशांत सावरकर
0 टिप्पण्या