Advertisement

श्रीराम नवमी व हनुमान जन्मोत्सव निमित्य अखंड हरिनाम सप्ताह


श्रीराम नवमी व हनुमान जन्मोत्सव निमित्य अखंड हरिनाम सप्ताह


रविवार दि.६ ते १३ एप्रिल २०२५ पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन. 


कन्हान : - माऊली हरिपाठ भजन मंडळ, हनुमान मंदीर पंचकमेटी आणि समस्त वराडा गावकरी व्दारे श्रीराम नवमी व हनुमान जन्मोत्सव निमित्य अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करून श्रीराम नवमी व हनुमान जयंती थाटात साजरी करण्यात येत आहे.


आपुली आपण करा सोडवण| संसार बंधन तोडा वेगी !!


वर्तमान कलियुगातील संसारीक जिवन जगत असतांना कुठेतरी सुखाची अपेक्षा मनुष्य करत असतो पण त्याचा पदरी दुख पडते म्हणुन भगवंताचा गोड कथेचे व किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री राम कथा व संकिर्तन श्रवणाने आयु , आरोग्य व एश्वर्य प्राप्त होऊन सर्व पाथका पासुन मुक्ती मिळेल असे या कथेचा संकिर्तनात रोज सकाळी व सायंकाळी उपस्थित राहुन भक्ती अमृत रसाचा लाभ घ्यावा असे आवाह न आयोजकांनी केले आहे. 


रविवार (दि.६) एप्रिल २०२५ ला सकाळी ७ वा. हभप. बाळकृष्ण महाराज घोडमार यांचे शुभ हस्ते श्री हनुमंतांचा अभिषेक, कलश स्थापना, दिप प्रज्वलन पुजा व आस्ती करून अखंड हरिनाम सप्ताह प्रारंभ करण्यात आला. सकाळी ९ ते ११ श्रीराम कथा हभप कु. श्रुतिका राजेंद्र घोडमारे ने श्रीरामाची महिमा सादर करून दुपारी १२ वाजता श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. सायं.६ वा. श्रीराम नवमीची भव्य पालखी दिंडी शोभायात्रा काढुन गाव भ्रमणात भक्ती मय गाव न्हावुन निघाले. मृदंग वादक प्रज्वल वानखेडे, गायक उज्वल उरकुुडे, निखील आमले, अमोल देऊळकर, गुरुदेव भजन मंडळ, शिवगौरी भजन मंडळ, शारदा महिला भजन मंडळ, बाल गणेश भजन मडळ,शिव भजन मंडळ वराडा सह वारकरी मंडळीने सुंदर भजना वर नुत्य करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. हरिनाम सप्ताह दररोज सकाळी ६ ते ७ काकड़ा आरती व भजन, सकाळी ९ ते ११ व सायंकाळी ४ ते ६ श्रीराम कथा , सायं. ६ ते ७ हरिपाठ, रात्री ९ ते ११ भजन, किर्तन होईल. शनिवार (दि.१२) ला सायं. ८.३० ते १०.३०वा जेपर्यत हभप. आदित्य महाराज करडमारे मु.आळंदी देवाची यांचे किर्तन, रविवार (दि.१३) ला दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत हभप. वासुदेव महाराज वाढिवे मु. आळंदी देवाची यांचे गोपाल काल्याचे कीर्तन करून महाप्र साद वितरण करून सप्ताहाची सांगता करून श्री हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात येईल. सप्ताह विणेकरी हभप. गणपत महाराज वाढई, शरद चिखले, राम दास बावणे, ज्ञानेश्वर देऊळकर, मृदंग वादक- दुर्गेश महाराज कडु, बबनराव भिलकर, गायक राजेंद्र ठाकरे, भगवान कडु, किशोर टाले, प्रफुल देऊळकर, धनराज नेवारे, टाळकरी ईश्वर घोडमारे, शांतनु वानखेडे, पियुश हेटे, स्वप्नील अवसरे, वेदांत शेळकी, रोशन जामदार, आदित्य बोरकर, योगेश जामदार आदी सहकार्य करित आहे . 


कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता माऊली हरिपाठ भजन मंडळ, हनुमान मंदीर पंच कमेटी आणि माजी सभापती देविदास जामदार, देवाजी शेळकी, सरपंच सुनिल जामदार, ईश्वर घोडमारे, कैलाश पुंड, अमोल देऊळकर, संजय नेवारे, रोशन जामदार, पियुष हेटे, दुर्गेश कडु, शांतनु वानखेडे, शुभम नागमोते, पंकज हेटे, शुभम पुंड, राहुल खोब्रागडे, क्रिष्णा खिळेकर, मारोती जामदार सह समस्त वराडा ग्रामस्थ परिश्रम घेत आहे .


कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या