बिना परवाना रेतीची वाहतुक करीत असल्याचे आढळून आले असता पारशिवनी पोलीस स्टेशन ची कार्यवाही
पारशिवनी :- पारशिवनी खापरखेडा मार्गाने रेतीची बिना रायल्टी वाहतुक होत असल्याचे लक्षात येताच त्यांना थाब ऊन चौकशी केली असता आढडले की ट्रक मध्ये रेती बिना रायल्टी जात असुन त्याच्या वरती कार्यवाही करण्यात आली.
अपराध क्रमांक १५१/२५ कलम ३०३(२),४९,३(५) भारतीय न्याय संहिता सहकलम ४८(७)(८) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमासह कलम ४,२१ खानखनीज अधिनियमानुसार ट्रक टिप्पर क्रमांक एम.एच ३६- एफ ३०२७ चा आरोपी शाबिर इसुप तेले वय २७ वर्ष मु.बिना संगम या.कामठी जिल्हा नागपुर, ट्रक टिप्पर क्रमांक एम.एच.४० बि.यु.६०२१ चा चालक राजकुमार शंकर नागोसे वय ३८ वर्ष मु.भानेगाव ता.सावनेर जिल्हा नागपुर येथील रहिवासी असून तामसवाडी परीसरातील कन्हान नदीच्या पात्रामधुन पाधन रस्त्याने खापरखेडया कडे बिना रायल्टी रेतीची वाहतुक करीत असल्याचे दिसून आले.
त्या वेळी दोन्ही ट्रक टिप्पर वरती रेती वाहुन नेत असताना दिनांक ४/४/२०२५ च्या सकाळी ८ ते ९ च्या दरम्यान हि कार्यवाही पोलीस निरीक्षक राजेश कुमार थोरात यांच्या मार्गदर्शनामधये पोलीस उपनिरीक्षक हिम्मत राठोड, पोलीस हवालदार दिलीप टेकाम, संदिप नागोसे, पोलीस शिपाई जगदिश उके कार्यवाही करण्यात आली.
पारशिवनी प्रतिनिधी सतीश साकोरे आणि प्रशांत सावरकर
0 टिप्पण्या