Advertisement

कन्हान शहर विकास मंच द्वारे शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली

कन्हान शहर विकास मंच द्वारे शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली


कन्हान - : जोपर्यंत या मातीत एकही भारतीय जिवंत आहे , तोपर्यंत आमच्या बलिदानाची ज्योत कधीही मावळणार नाही . या शहीद भगतसिंग यांच्या विचारांना स्मरून कन्हान शहर विकास मंच द्वारे शहिद दिवसा निमित्त तारसा रोड शहिद चौक येथे वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .


कार्यक्रमाची सुरुवात मंचचे नवनिर्वाचित सदस्य राजेश मेश्राम यांच्या हस्ते शहीद प्रकाश देशमुख यांच्या स्मारकावर पुष्पहार अर्पण करून झाली . यावेळी शहिद भगतसिंग , सुखदेव थापर आणि शिवराम हरि राजगुरू यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून त्यांना वंदन करण्यात आले . कार्यक्रमात मंचचे मार्गदर्शक भरत सावळे , सदस्य लोकेश दमाहे आणि ऋषी देशमुख यांनी शहीदांच्या त्यागावर आणि त्यांच्या संघर्षमय जीवनावर प्रकाश टाकला . त्यांच्या शब्दांनी उपस्थितांचे अंतःकरण भारावून गेले . आज आपण मोकळ्या आकाशाखाली उभे आहोत , कारण कोणीतरी या मातेसाठी आपले आयुष्य अर्पण केले , हे वाक्य ऐकताच उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू तरळले .


यानंतर मंचच्या सर्व सदस्यांनी वीर जवानांच्या प्रतिमांना नतमस्तक होत पुष्प अर्पण केले . शहीद जवान अमर रहे , या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आणि वातावरणात देशभक्तीची भावना अधिकच गहिर झाली . दोन मिनिटांचे मौन पाळून वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली . या भावनिक क्षणी उपस्थित प्रत्येकाच्या मनात एकच विचार उमटत होता . या शहिदांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही , जोपर्यंत आपण त्यांच्या त्यागाचा आदर करत राहू , तोपर्यंत भारत देश अभिमानाने उन्नत राहील .


या प्रसंगी कन्हान शहर विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर , मार्गदर्शक भरत सावळे , प्रभाकर रुंघे , लोकेश दमाहे , साहिल सैय्यद , सौरभ गुरधे , राजेश मेश्राम , अनुराग महल्ले , कृणाल सिंग राजपूत , शंकर कोंगे , माहेर इंचुलकर , आनंद शर्मा यांच्यासह मंचचे अनेक सदस्य उपस्थित होते .

Emotional tribute to the martyrs by Kanhan City Development Forum

कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या