Advertisement

अवैध सावकारी करणाऱ्यांवर ती गुन्हा दाखल झाल्यानंतर ही अटक का नाही. याला बड कुणाचे? जनते मध्ये चर्चेचा विषय असून आत्महत्या केल्या नंतर अटक होईल का?


अवैध सावकारी करणाऱ्यांवर ती गुन्हा दाखल झाल्यानंतर ही अटक का नाही. याला बड कुणाचे? जनते मध्ये चर्चेचा विषय असून आत्महत्या केल्या नंतर अटक होईल का?


पारशिवनी :-  शहरांमध्ये व तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवैध सावकारी चालू असुन फिर्यादी हर्षल गंगाधर सोनवाने वय ३० वर्ष मु. पारशिवनी यांनी पोलिस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांना आरोपी राहुल दशरथ डोमकी मु.पारशिवनी आणि स्वप्नील हरिचद ढोरे वय ३० वर्ष मु. भुलेवाडी यांच्या नावाने रिपोर्ट केल्या नंतर नागपूर जिल्हा पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांच्या आदेशानुसार पारशिवनी पोलीस स्टेशन ला दिनांक १५/०३/२०२५ ला गुन्हा दाखल करण्यात आला.

                  पण आजही आरोपी खुलेआम फिरत असुन त्यांना आतापर्यंत अटक करण्यात आली नाही.यानी लोकांना व्याजानी पैसे तर दिले पण हे राहुल डोमकी आणि स्वप्नील हरिचद ढोरे हे १ ते ३ टक्के व्याजाची रक्कम दुसऱ्या कडुन आनुन इकडे १० ते २० टक्के व्याजानी दिले जाते. एवढेच नाही तर व्याजाची रक्कम मिळाली तर व्याज तेवढाच राहतो नाही तर प्रत्येक दिवशी १० टक्के व्याज वाढत जातो म्हणजे एक प्रकारे लुटमार यांनी चालू केले ली असल्याचे लक्षात येते एवढेच नाही. तर कुणाच्या घरी जाऊन झगडे लावणे, गनधया भाषेत बोलणे, त्यांच्या घरचे सामान उचलुन आनणे त्यांच्या कडुन रजिस्टरी किंवा चेक घेऊन त्यांना व्याजानी रक्कम दिली जाते असे तालुक्यांमध्ये भरपुर से प्रकार घडले आहेत आणि घडत आहेत. या मुळे भरपुर लोकांचे घर आणि कुटुंब उध्वस्त झाले आहेत. 

अशा अश्या प्रकारे यांची दादागिरी चालु असुन अवैध सावकारी करणाऱ्यांचे जाळे मोठ्या प्रमाणामध्ये जिकडे तिकडे पसरले असल्यामुळे यांना ताबडतोब अटक करुन कार्यवाही करणे आवश्यक असल्याची चर्चा तालुक्यांमध्ये चालू असुन यांना अटक न झाल्यास जनता भडकेल आणि पारशिवनी तालुक्यातील जनता भडकल्यास पारशिवनी पोलीस स्टेशन जिम्मेदार राहिलं राहील असे ही बोलले जात आहे.

                   कलम महाराष्ट्र सावकारी अधिनियमा नुसार सहकलम ३५२,३५१,(२),(३),(५), बि.एम.एस. प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली असुन यांच्या सोबत रोजीने पैसे वसुली करण्याकरिता मुलं पण ठेवलेले आहे. राहुल डोमकी आणि स्वप्नील ढोरे यांना ताबडतोब अटक करुन रिमांड घेऊन अवैध सावकारी करणारे यांच्या सोबत कोणकोण आहेत ते यांच्या कडुन माहिती घेऊन यांची सि.बि.आय. चौकशी करणे आवश्यक आहे.अशी चर्चा जनते मध्ये चालू आहे.तर यांच्या कडे ज्या लोकांचे कागद पत्र आहेत ते त्यांना परत करणे आवश्यक असुन यांच्या कडे मोटारसायकल, फोर व्हिलर आहेत त्या त्यांना परत करणे आवश्यक आहे.अशी तालुक्यातील जनते कडून माहिती प्राप्त झाली असून पुढील तपास थानेदार राजेश कुमार थोरात यांच्या मार्गदर्शनामध्ये रामराव पवार आणि सुर्य प्रकाश वावरे करीत आहेत. 

Why is this arrest not made after the illegal moneylenders were booked? Whose fault is this? It is a topic of discussion among the public and will they be arrested after committing suicide?

सतीश साकोरे पारशिवनी प्रतिनिधी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या