अवैधरित्या देशी दारु विकणाऱ्यांवर पोलीसांचा छापा , चार आरोपी अटक
८७ निपा सह ६०९० रुपयांचा मुद्देमाल जप्त
कन्हन पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा पथकाची कारवाई
कन्हान : - कन्हान परिसरात अवैधरित्या देशी दारु विक्री करणाऱ्या तीन ठिकाणी कन्हान पोलीसांनी आणि एका ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामीण पोलीस पथकाने छापा मारुन चार आरोपींना अटक करुन त्याचा जवळुन ८७ निपा सह ६०९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन गुन्हा दाखल केला आहे . होळी आणि धुलिवंदन सण उत्सवाच्या पार्श्वभुमीवर नागपुर ग्रामीण पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी ग्रामीण पोलीसांना अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते .
बुधवार (दि.१२) ते शुक्रवार (दि.१५) मार्च च्या कालावधीत स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामीण पोलीस पथक आणि कन्हान पोलीस परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदारा च्या आधारे पोलीसांनी पिपरी , एम जी नगर , वाघधरे वाडी , धरम नगर येथे अवैधरित्या देशी दारु विक्री करणाऱ्या अड्यावर छापा मारुन चार आरोपींना ताब्यात घेतले .
पोलीसांनी आरोपींना परवाना विचारले असता त्यांनी परवाना नसल्याचे सांगितल्याने पोलीसांनी आरोपी १) रमेश गोविंदराव ढोमणे वय ६५ , २) अमोल मालाधारे वय २० , ३) अलताब ईदल पुरवले वय ५० , ४) अरविंद अजीत गायकवाड वय २० चौघे ही राहणार कन्हान यांना अटक करुन त्याचा जवळुन देशी दारु भिंगरी संन्ना नंबर १ चा कागदी लेबल लागलेल्या प्लाॅस्टिक व काचेच्या ८७ निपा किंमत ६०९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला .
या प्रकरणी कन्हान पोलीसात चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे .
देशी दारु दुकानातुक अवैधरित्या विक्री आणि वाहतुक करणाऱ्या वर पोलीसांची कारवाई
होळी आणि धुलिवंदन सण उत्सवाच्या पार्श्वभुमीवर गुरुवार (दि.१४) मार्च ला सायंकाळी ४:३० वाजता च्या दरम्यान कन्हान पोलीस खदान परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदारा कडुन माहिती मिळाली कि खदान नंबर सहा कडुन खदान नंबर तीन कडे एक इसम दुचाकी वाहना ने दारुची वाहतुक करणार आहे .
अश्या मिळालेल्या माहिती वरुन पोलीसांनी जुन्या सब एरिया आॅफिस जवळ नाकाबंदी करीत असतांना संशयित दुचाकी वाहन येतांना दिसल्याने चालकास थांबविण्याचा इशारा केला असता चालकाने वाहन थांबविले . पोलीसांनी वाहनाची पाहणी केली असता सदरचे वाहन हे हिरो एच एफ डिलक्स दुचाकी वाहन क्रमांक एम एच ४० बी आर ७०९८ असल्याचे दिसले .
पेट्रोल ट्रॅंक वर दोन खाकी रंगाचे भिंगरी देशी दारु लिहलेले खोके ठेवलेले दिसल्याने पोलीसांनी खोक्याची पाहणी केली असता देशी दारुच्या निपा दिसुन आले . पोलीसांनी चालक रविशंकर मोतीचंद गिरी (वय २८) रा.खदान ला अटक करुन त्याचा जवळुन १४८ निपा किंमत ६८६० रुपए आणि दुचाकी वाहन किंमत ३५,००० रुपए असा एकुण ४१,८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला .
या प्रकरणी सरकार तर्फे फिर्यादी सहायक पोलीस निरीक्षक राहुल चव्हान यांचा तक्रारी वरून आरोपी रविशंकर गिरी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे .
Police raid on illegal country liquor sellers, four accused arrested
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर
0 टिप्पण्या