घोगरा येथिल महादेवाचे लाखो भक्तांनी घेतले दर्शन
पारशिवनी येथिल घोगरा महादेव येथे दरवर्षी शिवरात्रीला लाखोंच्या संख्येने भक्त उपस्थित राहत असुन घोगरा महादेव हे पेंच नदी च्या पात्रा मध्ये असुन येथे हप्त्या मधुन तिनं ते चार दिवस मोठ्या प्रमाणामध्ये भक्तांची गर्दी राहत असुन येथे भाविक भक्त हे भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, अमरावती, वर्धा,छिदवाडा इत्यादी जिल्हा मधुन भक्त मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित राहत असतात हि यात्रा शिवरात्र निमित्त दोन दिवस चालत असुन येथे भक्तांना जाण्या येण्या करीता परेशानी जात असुन रोड चे चौवडी कर करणे आवश्यक आहे.
एवढेच नाही तर येथे छोटे मोठे १५० ते दोनशे दुकाने लागलेली होती. एवढेच नाही तर येथे झुले पण यावर्षी लावण्यात आले होते.गाडया पार्किंग करीता जागा कमी पडत असल्यामुळे गाड्यांची पार्किंग जिथे जागा मिळेल तिथे केली जाते.
तर रामटेक कडुन येणार्या भक्तांना माहुली मार्ग काळाफाटा ते घोगरा पाठवण्यात येत होते.तसेच पालोरा येथे गाड्या ठेऊन त्या पाई पाठवण्यात येत होते हि कारवाई पारशिवनीचे सुरेश वाघचौरे आणि पारशिवनी चे ठाणेदार राजेश कुमार थोरात यांच्या मार्गदर्शनामध्ये घोगरा रोड, शिवाजी चौक,पालोरा फाटा आणि नयाकुळ येथे कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता.
satish sakore. parseoni
0 टिप्पण्या