Advertisement

कन्हान ते शिर्डी श्री साईराम पालखी पदयात्रा भव्य मिरवणुकीने उत्साहात प्रस्थान


कन्हान ते शिर्डी श्री साईराम पालखी पदयात्रा भव्य मिरवणुकीने उत्साहात प्रस्थान

कन्हान - : "तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन – साईबाबा, मी शिर्डीला पायी चालत येईन!" या भक्तीमय जयघोषात, श्री साईराम पालखी सोहळा समिती कन्हानच्या वतीने आयोजित कन्हान ते शिर्डी पालखी पदयात्रेचा भव्य शुभारंभ झाला . रविवार १६ मार्च ते रविवार ६ एप्रिल २०२५ या कालावधीत १५ व्या वर्षी श्रीराम नवमी उत्सवानिमित्त ही पवित्र पालखी यात्रा भक्तिभावाने आयोजित करण्यात आली आहे.

रविवार १६ मार्च रोजी दुपारी १ वाजता, श्री साई मंदिर, इंदिरा नगर, कन्हान येथून बँड, डिजे, साई रथ, पालखी आणि "साईच्या गर्जेने" दुमदुमलेल्या भक्तीमय वातावरणात पदयात्रेला प्रस्थान मिळाले. शहरातील शहिद प्रकाश देशमुख चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, रेल्वे स्टेशन रोड, गांधी चौक या ठिकाणी भाविक भक्तांनी फुलांचा वर्षाव करत जल्लोषात स्वागत केले.

यात्रेदरम्यान अजय ठाकरे, रुपाली ठाकरे, मनोज चिकटे, वंदना चिकटे, साई ठाकरे, भार्गव ठाकरे यांच्या वतीने साईभक्तांना भोजनदान वितरित करण्यात आले. तसेच भाविकांसाठी पाणी, शरबत, फळे यांचे वाटप करण्यात आले.

कन्हान , कामठी , नागपुर मार्गाने होत सायंकाळी पालखी श्री साईकृपा संस्थान, नागार्जुन कॉलनी, जरीपटका, रिंग रोड, नागपूर येथे मुक्कामाला थांबली. सोमवार १७ मार्च रोजी सकाळी पालखी कळमेश्वर मार्गे पुढे शिर्डीच्या दिशेने मार्गक्रमण केले .

पालखी दिनचर्येनुसार सकाळी ५.३० वाजता काकड आरती, ६.३० वाजता मंगलस्नान व अभिषेक, दुपारी १२ वाजता मध्यान्ह आरती व नैवेद्य, सायंकाळी ४.३० वाजता साई गुरूपाठ व अभंग, ६.४५ वाजता धूपआरती आणि रात्री १०.३० वाजता शेजारती आयोजित करण्यात आली आहे. तसेच रविवार, ३० मार्च रोजी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर साई सच्चरित्र साप्ताहिक पारायण होणार आहे.

श्री साईराम पालखी सोहळा समिती कन्हानच्या वतीने नरेश बर्वे, मनोज चिकटे, अजय ठाकरे, महेश काकडे,मनोज काकडे, गणेश हटवार, चेतन अंबागडे, सतीश मूळे, आकाश गिरडकर, प्रमोद काकडे, मिलिंद पोपटकर, अविनाश रायपुरे, अनिल विश्वकर्मा, प्रविण माने, अविनाश जोरनकर, पंकज मूळे, साई ठाकरे, पवन माने, चेतन वैद्य, सुमित खैरकर, प्रविण पोपटकर, राजेंद्र शेंदरे, गौरव गिरडकर, अनिल नेवार आणि समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्य भक्तिभावाने कार्यरत आहेत.

कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या