Advertisement

कन्हान पोलिसांचा शक्तीप्रदर्शन! शांतता राखण्याचे कठोर आवाहन |

कन्हान पोलिसांचा शक्तीप्रदर्शन! शांतता राखण्याचे कठोर आवाहन

कन्हान - : नागपूर शहरातील महल भागात सोमवारी दोन गटांमध्ये उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर कन्हान शहर व ग्रामीण भागात शांतता आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी कन्हान पोलिसांनी शहरात शक्तीशाली रूटमार्च काढत नागरिकांना कठोर इशारा दिला आहे.

दंगलीनंतर नागपूर ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यात तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू केल्या . ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस निरीक्षकांना संवेदनशील भागात कडक गस्त वाढवण्याचे आदेश दिले असून, प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत रूटमार्च काढण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

या आदेशाच्या अनुषंगाने मंगळवारी कन्हान पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र पाटील आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात आणि ग्रामीण भागात व्यापक रूटमार्च काढण्यात आला . हा रूटमार्च कन्हान पोलीस ठाण्यातून सुरू होऊन महामार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, तारसा चौक, सात नंबर नाका मार्गे गांधी चौकावर पोहोचून पुन्हा पोलीस ठाण्यावर संपला.

पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी नागरिकांना कठोर शब्दांत चेतावणी दिली आहे— "कोणीही सोशल मीडियाद्वारे अफवा पसरवू नका . अफवांवर विश्वास ठेवू नका . समाजात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल . या शक्तीशाली रूटमार्चमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड , पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्यासह ८ अधिकारी , १ एसआरपी पथक, १४ पोलीस कर्मचारी आणि २७ होमगार्ड सहभागी झाले होते.

कन्हान पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, शहरातील शांतता भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. नागरिकांनी संयम राखावा, अफवांना बळी पडू नये आणि कोणत्याही संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी असे कळकडीचे आव्हाहन केले आहे.

कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या