Advertisement

जिजाऊ रथयात्रा २०२५ च्या स्वागताकरिता कन्हान, कामठी नियोजन बैठक संपन्न

जिजाऊ रथयात्रा २०२५ च्या स्वागताकरिता कन्हान, कामठी नियोजन बैठक संपन्न

जिजाऊ रथयात्रा दि. १८ मार्च ते १ मे २०२५. 

कन्हान : - मराठा सेवा संघा व़्दारे " जिजाऊ रथयात्रा २०२५ " मराठा जोडो अ़भियान हे वेरूळ येथुन प्रारंभ होऊन महाराष्ट्रात ४५ दिवस भ्रमण करून लाल महाल पुणे येथे समापन करण्यात येणार आहे  .

नागपुर जिल्हयात आगमण होताच भव्य स्वागत करण्याकरिता जिल्हा पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन कन्हान , कामठी येथील पदाधिकाऱ्यांकडे भव्य स्वागत कार्यक्रमाचे नियोजन सोपविण्यात आले .

रविवार (दि.२३) मार्च ला मराठा सेवा संघ कन्हान कार्यालय राम नगर येथे झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिजाऊ ब्रिगेड नागपुर जिल्हाध्यक्षा स्वाती शेंडे होत्या. प्रमुख अतिथी संगीतसुर्य केशवराव भोसले संगीत कक्ष अध्यक्षा, संजीवनी सोमवंशी, अशोक डहाके, संभाजी ब्रिगेड नागपुर शहराध्यक्ष प्रताप पटले, ग्रामिण अध्यक्ष संजय कानतोडे, मराठा सेवा संघ मौदा तालुकाध्यक्ष ईश्वर डहाके सह आदींची प्रामुख्याने उपस्थित होती.

सर्व प्रथम राष्ट्रमाता जिजाऊ, शिवराय व महापुरूषाच्या एकत्रित प्रतिमेला पुष्पहार वाहुन जिजा़ऊ वंदन घेऊन बैठकीची सुरूवात करण्यात आली .  स्वाती शेंडे यांनी जिजाऊ रथयात्रा नागपुर जिल्हयात भंडारा वरून रविवार (दि.१३) एप्रिल २०२५ ला मौदा शहरात आगमण  होणार असल्याचे सांगितले. कुही,उमरेड वरून रात्री नागपुर येथे आगमन होऊन सोमवार (दि.१४) आणि मंगळवार (दि.१५) एप्रिल ला शहरात भ्रमण करणार आहे.

बुधवार (दि.१६) एप्रिल ला नागपुर वरून सका़ळी ९ वाजता कामठी , १० वाजता कन्हान येथे जिजाऊ रथयात्रेचे आगमन होणार असल्याचे सांगितले. त्यानंतर पारशिवनी, खापा, सावनेर, काटोल मार्गक्रमणाची माहिती दिली. 

या भव्य कार्यक्रमाची चर्चा करून कामठी चे एकनाथ लांजेवार, आय रहमान, कन्हान चे शांताराम जळते, ताराचंद निंबाळकर यांनी सहकारी पदाधिकारी, सदस्यासह स्वागताची जिम्मेदारी स्विकारून कामठी, कन्हान व पारशिवनी मध्ये जिजाऊ रथ यात्राचे स्वागत, सत्कार करण्याची हमी घेतली. 

या प्रसंगी जिजाऊ ब्रिगेड कन्हान अध्यक्षा मायाताई इंगोले, लताताई जळते, ताराचंद निंबाळकर,  शांताराम जळते, मोतीराम रहाटे, वसंतराव इंगोले, राजेंद्र गाढवे, एकनाथ लांजेवार, आय रहमान, प्रभाकरराव घंटा, दिवाकर इंगोले, राकेश घोडमारे, अमोल डेंगे, योगराज अवसरे आदी सह मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड चे सदस्य बैठकीत प्रामुख्याने उपस्थित होते.

Kanhan, Kamathi planning meeting concluded to welcome Jijau Rath Yatra 2025

कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या